स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान; 'राष्ट्रवादी परिवार संवाद'ची घोषणा

By मोरेश्वर येरम | Published: January 23, 2021 05:20 PM2021-01-23T17:20:46+5:302021-01-23T17:24:03+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज 'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा केली आहे

Jayant Patil made a big statement about independent elections; Announcement of 'Nationalist Family Dialogue' | स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान; 'राष्ट्रवादी परिवार संवाद'ची घोषणा

स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान; 'राष्ट्रवादी परिवार संवाद'ची घोषणा

Next

"प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा अजिबात विचार नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि भाजपला पराभूत करणं हेच आमचं ध्येयं आहे", असं जयंत पाटील म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज 'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा केली आहे. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. 

"जयंत पाटील हे राजकारणात अनावधानानं आलेलं पात्र," गोपिचंद पडळकर यांची बोचरी टीका

"राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणखी एक पाऊल पुढे जात असून १७ दिवसांच्या या दौऱ्यात विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका व १० जाहीर सभा होणार आहेत", अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. गडचिरोतील अहेरीपासून ही परीवार संवाद यात्रा काढली जाणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.  

'टीआरपी' घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच संवाद, समन्वय व पारदर्शकतेची भूमिका घेतली आहे. याआधीही पक्षाने कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' ही डिजिटल मोहीम हाती घेतली होती. राज्यातील कार्यकर्त्यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सात लाख कार्यकर्त्यांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आपला अभिप्राय या मोहिमेत नोंदवल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. 

'मलाही उद्या मुख्यमंत्री व्हावसं वाटलं तर...'; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर पवारांनी दिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळालं. येत्या काही दिवसातच नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
 

Web Title: Jayant Patil made a big statement about independent elections; Announcement of 'Nationalist Family Dialogue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.