J&K DDC Result: जम्मूमध्ये भाजपा बनला सर्वात मोठा पक्ष; तरीही गुपकार युती आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 10:42 PM2020-12-22T22:42:47+5:302020-12-22T22:48:02+5:30
J&K DDC Result: डीसीसी निवडणुकीत गुपकार आघाडी जरी पुढे असली तरीही भाजपाने मुस्लिम बहुल काश्मीर घाटीमध्ये एक जागा जिंकून रेकॉर्ड बनविले आहे, भाजपाविरोधात सात पक्षांनी एकत्र येत गुपवाक आघाडी बनवत निवडणूक लढविली होती.
जम्मू/श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. ३७० कलम हटविल्यानंतर भाजपाला मिळालेले हे मोठे यश आहे. जम्मू विभागामध्ये भाजपा जवळपास ७४ जागांवर आघाडीवर असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर गुपकार आघाडीला काश्मीर विभागात बहुमत मिळाले आहे. याचबरोबर दोन्ही विभागात अपक्षांची संख्याही लक्षनिय आहे. जर हे बहुमत निकालात परिवर्तीत झाले तर अध्यक्ष निवडणुकीत अपक्ष निर्णायक ठरणार आहेत.
काश्मीर डिव्हिजन
गुपकार - 87
भाजप : 03
अपनी पार्टी : 08
अपनी पार्टी : 08
अपक्ष व इतर : 32
जम्मू डिव्हिजन
भाजप : 74
गुपकार : 16
अपनी पार्टी : 02
काँग्रेस: 15
अपक्ष व इतर : 33
डीसीसी निवडणुकीत गुपकार आघाडी जरी पुढे असली तरीही भाजपाने मुस्लिम बहुल काश्मीर घाटीमध्ये एक जागा जिंकून रेकॉर्ड बनविले आहे, भाजपाविरोधात सात पक्षांनी एकत्र येत गुपकार आघाडी बनवत निवडणूक लढविली होती. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पिपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, J&K पीपल्स मूव्हमेंटसोबत सीबीआय आणि सीपीएम एकत्र आले आहेत.
राज्यात २८० जागांवर आठ टप्प्यांत निवडणूक झाली. यामध्ये ४५० हून अधिक महिलांसोबत ४१८१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.