“उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले, योगींनी UP ला आघाडीचे राज्य बनवले”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 10:15 PM2021-07-16T22:15:12+5:302021-07-16T22:19:01+5:30

योगी सरकारच्या कारभारामुळे उत्तर प्रदेश देशात आघाडीचे राज्य बनले आहे, असे कौतुकोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काढले आहे.

jp nadda appreciates yogi adityanath and uttar pradesh govt | “उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले, योगींनी UP ला आघाडीचे राज्य बनवले”

“उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले, योगींनी UP ला आघाडीचे राज्य बनवले”

Next

लखनऊ: गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे उत्तर प्रदेश देशपातळीवर चर्चेत आहे. एक म्हणजे वाराणसी दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणावरून योगी सरकारचे कौतुक केले आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेसने निशाणाही साधला. यानंतर, उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले असून, योगी सरकारच्या कारभारामुळे उत्तर प्रदेश देशात आघाडीचे राज्य बनले आहे, असे कौतुकोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काढले आहे. (jp nadda appreciates yogi adityanath and uttar pradesh govt) 

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपचे आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी योगी सरकारचे प्रशंसा केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही नड्डा यांनी केले. 

“PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले

उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले असून, योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारामुळे राज्य आघाडीवर पोहोचले आहे. देशातील तुष्टीकरण संपुष्टात आले आहे. तसेच यापूर्वीच्या सरकारमध्ये घराणेशाही वाढली होती. मात्र, योगी सरकारच्या कालावधीत घराणेशाही संपून राज्य प्रगतीपथावर पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याचे प्राक्तन आणि चित्र बदलवले, असे सांगत पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे विरोधकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. जनतेने विरोधकांना नाकारले आहे. आता त्यांची घरी बसायची वेळ आली आहे, असा टोला नड्डा यांनी लगावला आहे. 

जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचा; कावड यात्रेवरुन सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले

उत्तर प्रदेशात मोठी क्षमता

उत्तर प्रदेशमध्ये मोठी क्षमता आहे. त्यामुळे प्रत्येक बुध सशक्त आणि मजबूत करण्यावर लोकप्रतिनिधींनी भर द्यायला हवा. तसेच भाजपची संघटना पुढे नेण्यासाठी योगदान द्यायला हवे, असे सांगताना उत्तर प्रदेश सरकार विकसित राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच डिसेंबर महिन्यापर्यंत १३३ कोटी देशवासीयांना लस देण्यात येईल, असे सांगितले जाते.

कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचे क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. मोदी आणि योगी हे सत्य विसरले असले, तरी ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे, ते कधीच विसरू शकणार नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

Web Title: jp nadda appreciates yogi adityanath and uttar pradesh govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.