पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 05:29 PM2024-11-01T17:29:50+5:302024-11-01T17:32:19+5:30
Judenge Toh Jeetenge: योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडून उत्तर दिलं जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये आता पोस्टर वार सुरू झाली आहे.
Judenge Toh Jeetenge vs batenge toh kitenge: विधानसभा निवडणुकीमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंग'ची चर्चा सुरू असून, त्याला आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. समाजवादी पार्टीकडून उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पोस्टर लावण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये पोस्टर वार रंगू लागलं आहे.
बटेंगे तो कटेंगे विरुद्ध जुडेंगे तो जितेंगे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली आहे. त्यांच्या या घोषणेचे पोस्टरही झळकले. त्यांच्या या घोषणेला आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने प्रत्युत्तर दिले आहे.
समाजवादी पार्टीचे नेते विजय प्रताप यादव यांनी अखिलेश यादव यांच्या फोटोसह लखनौतील राज भवन चौकापासून समाजवादी पार्टीच्या कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर जुडेंगे तो जीतेंगे होर्डिंग्ज लावले आहेत.
#WATCH | Uttar Pradesh: Samajwadi Party (SP) workers put up a poster with the face of party chief Akhilesh Yadav and words 'Judenge Toh Jeetenge' in Lucknow. pic.twitter.com/azdDRDB9yt
— ANI (@ANI) October 31, 2024
समाजवादी पार्टीच्या या पोस्टरची आता लखनौपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. समाजवादी पार्टीने लखनौबरोबरच अनेक जिल्ह्यात सत्ताईस का सत्ताधीश असेही होर्डिग्ज लावल्या आहेत. त्यातून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे जिंकणार आहेत, असे संकेत दिले गेले आहेत.