'थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद; नारायण राणेंचं वाक्य चुकीचं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 03:07 PM2021-08-25T15:07:18+5:302021-08-25T15:08:36+5:30

Narayan Rane vs Shivsena: 'एखादी गोष्ट चुकली तर राणेंना सांगण्यासाठी इतर पर्याय होते'

'This is just a common dialogue; Narayan Rane's sentence is not wrong ', says chandrakant patil | 'थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद; नारायण राणेंचं वाक्य चुकीचं नाही'

'थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद; नारायण राणेंचं वाक्य चुकीचं नाही'

Next

पुणे: काल(दि.24) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी त्यांना जामीन मिळाला, पण या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामन आलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी हिंसक आंदोलनही झाली. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

...हा कॉमन संवाद
पुण्यात बोलत असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना नारायण राणेंचं काही चुकलं नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. 'केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वाक्य चुकलं नाही. थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. एखादी गोष्ट चुकली तर राणेंना सांगण्यासाठी इतर पर्याय होते, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.  

सत्याचा विजय झाला
तसेच, काल दिवसभर झालेली कारवाई सूडबुद्धीनं झालीय, हे सिद्ध झालं.  आता राणेंना मोकळीक दिली, जामीन दिला. एसपीकडे दोनदा हजेरी लावण्यास सांगितलं. त्यांना नोटीस दिली आणि बोलताना सांभाळून बोललं पाहिजे असंही सांगितलं. पण, अखेर सत्याचाच विजय झाला. राज्य सरकार सारखं कोर्टाच्या थपडा खात आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली.

मुंबईत पोपटाचा प्राण
ते पुढं म्हणाले, राणेंना मुंबईत चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई हरली तर...? असा प्रश्न त्यांच्या मनात आहे. या मुंबईतच पोपटाचा प्राण आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच, कायदा सुव्यवस्था प्रश्न बरा आमच्या वेळीच निर्माण होतो. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललंय, असा आरोपही केला. याशिवाय, राणेंची तब्येत खराब असताना जेवणाच्या ताटावरुन त्यांना उठवणं अमानवीय असल्याचंही ते म्हणाले.
 

Web Title: 'This is just a common dialogue; Narayan Rane's sentence is not wrong ', says chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.