'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली..'; योगी आदित्यनाथांवर मनसेचे 'ठग'वॉर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 08:48 AM2020-12-02T08:48:50+5:302020-12-02T08:55:20+5:30

yogi adityanath mumbai visit : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला हलविणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी तेथे फिल्मसिटी उभारण्याच्या कामांना गतीही दिली.

'kaha Raja Bhoj...'; MNS's 'thug' war on Yogi Adityanath in Mumbai Visit | 'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली..'; योगी आदित्यनाथांवर मनसेचे 'ठग'वॉर

'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली..'; योगी आदित्यनाथांवर मनसेचे 'ठग'वॉर

Next

मुंबई : राज्यातील गुंतवणूक वाढावी, प्रस्तावित फिल्म सिटी मार्गी लावण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (yogi adityanath mumbai visit)  आले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनंतर आता मनसेनेही जोरदार टीका केली आहे. मनसेने आदित्यनाथ उतरलेल्या हॉटेलसमोरच पोस्टर लावत ठग असे संबोधल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला हलविणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी तेथे फिल्मसिटी उभारण्याच्या कामांना गतीही दिली. तसेच हिंदीच नाही तर मराठी सिनेमेदेखील बनविणार असल्याचे तिथल्या अध्यक्षाने जाहीर केले होते. 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आल्या आल्या अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. तसेच ते इतर दिग्दर्शक, अभिनेत्यांचीही भेट घेणार आहेत. यावर मनसेने निशाना साधला आहे. ''कहा राजा भोज...और कहा गंगू तेली..'; कुठे महाराष्ट्राचे वैभव, तर कुठे युपीचं दारिद्र्य, अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी युपीला नेण्याचं मुंगेरीलालचे स्वप्न असे हिणवत ''अपयशी राज्यातील बेरोजगारी लपविण्यासाठी मुंबईतील उद्योग पळविण्यासाठी आलेला 'ठग', असा पोस्टर मनसेने लावला आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये उतरले आहेत. 

मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत अयोजित कार्यक्रमात,  ‘महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील’, असा विश्वास व्यक्त केला. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. हे सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. राज्यात नवीन गुंतवणूक येते आहे. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्या सोबत असते हे तुम्हाला सांगता येईल, असे ते म्हणाले.

योगींच्या भेटीवर भाजप नेत्यांचे मौन का?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  महाराष्ट्रात येऊन  इथले उद्योग तिकडे नेण्याची भाषा करतात, तरीही भाजप नेते गप्प का, असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलीवूडने उत्तर प्रदेशात यावे असे आवाहन केले. त्यावर चव्हाण म्हणाले, भाजपच्या ५ वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. त्यावेळीही राज्यातील भाजप नेते गप्प बसले. 

 

Web Title: 'kaha Raja Bhoj...'; MNS's 'thug' war on Yogi Adityanath in Mumbai Visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.