शिवसेनेचा भाजपाला धक्का! मोहन डेलकरांच्या पत्नीला देणार लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 07:01 PM2021-10-07T19:01:21+5:302021-10-07T19:01:56+5:30
Dadra Nagar Haveli by-election:
दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. मोहन डेलकर यांनी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये येऊन आत्महत्या का केली हे अद्याप रहस्यच असताना भाजपाने डेलकर यांच्या पत्नीला उमेदवारी देणे टाळले आहे. यामुळे डेलकर यांच्या पत्नीला खासदारकीची उमेदवारी देण्याचा शिवसेनेने निर्णय घेतला आहे.
भाजपाचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांची पत्नी कलाबेन डेलकर (Kalaben Delkar), मुलगा अभिनव डेलकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. कलाबेन यांना दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवारी देणार आहे.
डेलकर यांनी मरीन ड्रॉइव्ह येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना मिळाली. डेलकर यांच्या मुलाने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला. अभिनव डेलकर याने केलेल्या तक्रारीनुसार, दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल आणि स्थानिक सरकारी अधिकारी यांनी मोहन डेलकर यांची छळवणूक केली होती. कारण त्यांना मोहन डेलकर यांना निवडणूक लढवण्यापासून अडवायचे होते. तसेच त्यांच्या महाविद्यालयाचा ताबा घेण्यापासून थांबवायचे होते.