हाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 05:08 PM2020-09-14T17:08:27+5:302020-09-14T17:12:23+5:30
कंगना राणौतचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील हल्ले सुरूच
मुंबई: शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद सुरूच आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला असं शिवसेना खासदार संजय राऊत स्पष्ट केलं आहे. मात्र कंगनाचे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील हल्ले सुरूच आहेत. आज मुंबई सोडून चंदिगढला रवाना झालेल्या कंगनानं पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.
मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; PoKवरून हटेना, टार्गेट शिवसेना!
कंगनानं ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. तिनं ट्विटमध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे. 'मी मुव्ही माफिया, सुशांतचे मारेकरी आणि ड्रग रॅकेटला उघडं पाडतेय, हीच गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी त्रासदायक ठरतेय. मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र आदित्य ठाकरे ज्यांच्यासोबत फिरतात, त्यांना मी उघडं पाडतेय, हीच त्यांची समस्या आहे. हाच माझा सर्वात मोठा गुन्हा आहे,' असं ट्विट कंगनानं केलं आहे.
याआधी कंगनानं शिवसेनेचा उल्लेख सोनिया सेना असा करत त्यांच्यामुळेच मुंबई सुरक्षित नसल्याचं म्हटलं होतं. 'चंदिगढमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिली आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. यावेळी मी वाचले, असं वाटतं. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीत उबदारपणा जाणवत होता आणि आज असा दिवस आहे, जेव्हा जीव वाचला म्हणजे खूप काही मिळाल्यासारखं वाटत आहे. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशत माजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे,' अशा शब्दांत कंगनानं शिवसेनेला लक्ष्य केलं होतं.
बिहार निवडणुकीत कंगना राणौत भाजपाची स्टार प्रचारक होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
चंडीगढ़ मे उतरते ही मेरी सिक्यरिटी नाम मात्र रह गयी है, लोग ख़ुशी से बधाई दे रेही हैं, लगता है इस बार मैं बच गयी, एक दिन था जब मुंबई में माँ के आँचल की शीतलता महसूस होती थी आज वो दिन है जब जान बची तो लाखों पाए, शिव सेना से सोनिया सेना होते ही मुंबई में आतंकी प्रशासन का बोल बाला।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
मुंबईतून निघताना शेरोशायरीतून निशाणा-
कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणौतने, महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचेही कंनाने म्हटले आहे.
जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धड़ियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं,
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
मुझे कमज़ोर समझ कर
बहुत बड़ी भूल कर रहे हैं!
एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर,
अपनी इमेज को धूल कर रहे हैं!!