"मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपात प्रवेश करेन", Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 12:51 PM2020-10-13T12:51:53+5:302020-10-13T12:56:56+5:30

Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे.

kanhaiya kumar says if you speak more anti national we will also join bjp | "मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपात प्रवेश करेन", Video व्हायरल

"मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपात प्रवेश करेन", Video व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली - बिहार विधानसभेला काही कालावधी शिल्लक असला तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार मैदानात उतरले आहेत. कन्हैया कुमार यांनी आपला गृहजिल्हा बेगूसराय येथून आपल्या निवडणूक अभियानाची सुरुवात केली आहे. या दरम्यान कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे. तसेच "मला सतत देशद्रोही म्हणत असाल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन", असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. 

कन्हैया कुमार हे सोमवारी बगूसराय जिल्हयातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सूर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचे नामांकन भरताना उपस्थित होते. नामांकनानंतर कन्हैया कुमार यांनी आयोजित सभेत भाजपावर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपाचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत असं देखील कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.

"मला सतत देशद्रोही बोलाल, तर मी भाजपात प्रवेश करेन"

"ज्योतिरादित्य शिंदे हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते अतिशय वाईट व्यक्ती होते. त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हा पासून ते भाजपाचे झाले. मी एके ठिकाणी बोललो आहे की मला जर तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणाल... तर मी बोलेन की खबरदार... जर जास्तच बोललात तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन. ज्यांना हे शिव्या देतात ते 5 मिनिटानंतर काका म्हणायला सुरुवात करतात" असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

कन्हैया कुमार हे बिहारमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हे बिहारमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. कन्हैया कुमार हे बेगूसरायेचच रहिवासी आहेत. यासोबतच ते सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य देखील आहेत. कन्हैया कुमार यांनी बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता. बिहार विधानसभा निवडणूक लढवायची नाही असं त्यांनी ठरवलं आहे. सीपीआयच्या उमेदवारांचा ते बिहारमध्ये प्रचार करणार आहेत.

तेजस्वी यादव आणि कन्हैया कुमार एकाच मंचावर दिसणार

लोकसभा निवडणुकीवेळी बिहारमध्ये कन्हैया कुमार यांना राष्ट्रीय जनता दलाने साथ दिली नव्हती. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा एका जातीचा पक्ष आहे असे त्या वेळी एका मुलाखतीत तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं. तर 2020 च्या विधानसभा निवडणुकीत सीपीआय महाआघाडीत सहभागी आहे. या पार्श्वभूमीवर महाआघाडीच्या उमेदवारांना विजयी बनवण्यासाठी तेजस्वी यादव आणि कन्हैया कुमार एकाच मंचावर दिसणार आहेत. मात्र या दोघांचा अजून एकत्र कार्यक्रम झालेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: kanhaiya kumar says if you speak more anti national we will also join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.