Karnataka CM: मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा; येडीयुराप्पांमुळे भाजपा नेतृत्वासमोर मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 09:57 PM2021-07-17T21:57:25+5:302021-07-17T22:02:41+5:30

Karnataka Politics: येडीयुराप्पा यांनी राज्यात येताच आमदारांची आणि मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. 26 जुलैला ही बैठक होणार आहे. त्या आधी त्यांनी दिल्लीत जात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे.

Karnatak CM bs yediyurappa ready to resign; but on three conditions; big challenge for the BJP leadership | Karnataka CM: मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा; येडीयुराप्पांमुळे भाजपा नेतृत्वासमोर मोठा पेच

Karnataka CM: मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा; येडीयुराप्पांमुळे भाजपा नेतृत्वासमोर मोठा पेच

googlenewsNext

नवी दिल्ली : उत्तराखंडचा मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता कर्नाटकातही (Karnatak CM) मोठा बदल करण्याची भाजपाने तयारी केली आहे. मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा (bs yediyurappa) यांची खुर्ची धोक्यात आली असून गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बंडाळीमुळे भाजपाने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला आहे. काँग्रेस-निजदला सत्तेवरून खाली खेचत येडीयुराप्पांनी भाजपाची सत्ता स्थापन केली होती. परंतू त्यांची एकाधिकारशाही भाजपाच्या अन्य नेत्यांना रुचली नसल्याने काही काळातच त्यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त होऊ लागली होती. (BJP will change karnataka CM soon; this names in que to Next CM.)

भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने येडीयुराप्पांना आज दिल्लीला पाचारण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेतल्यावर आपल्या खुर्चीला धोका नसल्याचे वक्तव्य येडीयुराप्पा यांनी केले आहे. परंतू, भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु झाल्या असून राज्यात लिंगायत समाजाचे वर्चस्व असल्याने त्याच समाजाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे. (bs yediyurappa met Amit Shah in Delhi.)

येडीयुराप्पा यांनी 2012 मध्ये भाजपा सोडून नवा पक्ष स्थापन केला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या केजेपी पक्षाला एकूण 9.8 टक्के मते मिळाली होती. तसेच 6 आमदार निवडून आले होते. त्यात येडीयुराप्पा, शोभा करंदलाजे हे होते. भाजपालाही मोठी झळ बसली होती. यानंतर येडीयुराप्पा यांनी भाजपात प्रवेश करत लोकसभा लढविली होती. लोकसभेला जिंकले व राज्याच्या निवडणुकीवेळी त्यांना पुन्हा राज्यात पाठविण्यात आले होते. जदयू-काँग्रेसचे सरकार पाडल्यानंतर येडीयुराप्पांचा पुत्र बी .एस. विजयेंद्र यांनी सरकारमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. यामुळे भाजपाच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. प्रकरण बंडापर्यंत पोहोचले होते. यामुळे मोठे राज्य हातचे जाऊ नये म्हणून भाजपा मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता आहे. 

येडीयुराप्पांच्या तीन अटी...
यासाठी लिंगायत समाजाच्याच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यासाठी येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत. 


चार नावे चर्चेत... (Who is next CM of Karnataka)
यामुळे सध्या चार नावांची चर्चा आहे. 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत आहेत. यतनाल यांनीच येडीयुराप्पांना हटविण्याची मागणी केली होती. आता भाजपा नेतृत्व येडीयुराप्पांचे लाड पुरविते की यतनाल यांना मुख्यमंत्री करते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Karnatak CM bs yediyurappa ready to resign; but on three conditions; big challenge for the BJP leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.