Karnataka Cabinet Expansion: येडीयुराप्पांना धक्का! बोम्मईंच्या मंत्रिमंडळात मुलगा विजेंद्रला जागा नाही; थोड्याच वेळात शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:34 PM2021-08-04T13:34:16+5:302021-08-04T13:35:49+5:30
Karnataka cabinet ministers list: येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री (Karnataka CM) पद सोडण्यासाठी दिल्लीतील नेत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी एकच अट मान्य केली आहे. परंतू दोन अटी फेटाळल्या आहेत.
Karnataka Cabinet: बेंगळुरु: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आज त्यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची घोषणा केली. यामध्ये एकही उपमुख्यमंत्री नाहीय. बोम्मई यांना गेल्या आठवड्यात भाजपाने नवे मुख्यमंत्री (Karnataka Chief Minister) म्हणून पुढे आणले होते. यानंतर त्यांनी 28 जुलैला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. बीएस येडीयुराप्पांना (bs yediyurappa)राजीनामा द्यावा लागला होता. (Karnataka Bengaluru Live Updates: 29 ministers to take oath at 2.15 pm today, no Deputy CM, says CM Bommai)
येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री (Karnataka CM) पद सोडण्यासाठी दिल्लीतील नेत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी होत्या. पैकी लिंगायत समाजाचा नेता निवडून भाजपश्रेष्ठींनी येडीयुराप्पांची एक अट मान्य केली आहे. बोम्मई हे येडीयुराप्पांचे खास आहेत. परंतू अन्य दोन अटी मान्य केलेल्या नाहीत.
बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात शपथविधी होणार आहे. यामध्ये येडीयुराप्पा यांचा मुलगा विजयेंद्र याला घेण्यात आलेले नाही. विजयेंद्र सरकारमध्ये आणि मंत्र्यांच्या खात्यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मंत्री आमदारांनी केला होता. यामुळे त्याला मंत्रिमंडळात घेतल्यास हे नेते नाराज होण्याची शक्यता होती. यामुळे विजयेंद्रला बाजुला सारण्यात आले आहे.
नव्या मंत्रिमंडळात जातीचे समीकरण पेलताना 8 लिंगायत, वक्कलीग आणि ओबीसी समाजाचे प्रत्येकी 7, 3 दलित एक एसटी आणि एका महिलेचा समावेश आहे. आज 29 मंत्री शपथ घेणार आहेत.
बोम्मई दोनदा दिल्लीला...
मुंख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बोम्मई दोनदा दिल्लीला गेले होते. दिल्लीवरून नव्या मंत्र्यांची नावे निश्चित करूनच ते राज्यात परतले होते.