“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”
By प्रविण मरगळे | Published: September 24, 2020 07:22 PM2020-09-24T19:22:51+5:302020-09-24T19:25:22+5:30
चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले.
श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा खासदार फारुक अब्दुल्ला यांनी काश्मीर लोक स्वत:ला भारतीय मानत नाही, ना त्यांना भारतीय व्हायचं आहे. भारताऐवजी चीनने त्यांच्यावर शासन करावं असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. यावरुन आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
याबाबत एका मुलाखतीत फारुक अब्दुल्ला म्हणाले की, तुम्ही जर काश्मिरींशी चर्चा केली तर अनेकांना चीनने भारतात यावं असं वाटत आहे. आपण तेथे जा आणि कोणाशीही बोला. ते स्वत: ला हिंदुस्तानी किंवा पाकिस्तानी मानत नाहीत. चीनने त्यांच्यावर राज्य करावे अशी त्यांची इच्छा आहे. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक आहे, मागील वर्षी ५ ऑगस्टला मोदी सरकारने जे केलं त्याचे शेवटचं केला असं त्यांनी सांगितले.
तर काश्मिरी लोकांना मोदी सरकारवर विश्वास राहिला नाही अशी लोकांची मानसिकता आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोपे होते, परंतु त्यांनी गांधींजींचा भारत निवडला होता मोदींचा भारत नाही. आज चीन दुसर्या बाजूने पुढे सरकत आहे. जर आपण काश्मिरींशी चर्चा केली तर बरेच लोक चीनने भारतात यावं असं म्हणतायेत. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले.
त्याचसोबत खोऱ्यात कोणीही भारताबद्दल काही सांगितले तर त्यांच ऐकणारं कोणीच नाही. तेथील प्रत्येक गल्लीत एके ४७ घेऊन जाणारे सुरक्षा कर्मचारी दिसतात. स्वातंत्र्य कुठे आहे? असंही फारुक अब्दुल्ला म्हणाले. यापूर्वी मंगळवारी फारुक अब्दुल्ला यांनी लोकसभेत म्हटलं होतं की, जम्मू-काश्मीरमध्ये शांततेसाठी कलम ३७० पुन्हा लागू करावा. गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी घेतलेल्या निर्णयावर केंद्र सरकारने पुन्हा फेरविचार करणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video: भेटायला आलेल्या डबेवाल्यांना राज ठाकरेंचा चिमटा; “सरकार त्यांच्या हातात द्या अन्…
पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा मोठा निर्णय; बलात्कार अन् छेड काढणाऱ्या आरोपींना शहरातील चौकात...
“मराठा नेत्यांना आरक्षण नको असतं तर अध्यादेश पारित केलाच नसता” माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार
खूशखबर! जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले
खासगी लॅबमध्ये ३० लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् सरकारी तपासात निगेटिव्ह