kerala election results : मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांची सुपरफास्ट आघाडी, केरळमध्ये भाजपासाठी जागवला आशेचा किरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 11:10 AM2021-05-02T11:10:35+5:302021-05-02T11:10:57+5:30
Kerala Assembly Election Results 2021 : केरळमध्ये आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये केरळमध्ये भाजपाला BJP फार मोठे यश मिळताना दिसत नसले तरी ई. श्रीधरन E. Sreedharan यांनी आपल्या मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे.
तिरुवनंतपुरम - देशामध्ये मेट्रोमॅन म्हणून नाव मिळवलेले ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करत भाजपाने केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली होती. (kerala assembly election results 2021) आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये केरळमध्ये भाजपाला फार मोठे यश मिळताना दिसत नसले तरी ई. श्रीधरन यांनी आपल्या मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे. ( Metroman E. Sreedharan lead from Palakkad)
ई. श्रीधरन हे केरळमधील पलक्कड मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या मतदारसंघातील मतमोजणीमध्ये आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपाचे ई. श्रीधरन यांना १० हजार ५५ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे शफी पराम्बिल यांना ५ हजार ७२२ मते मिळाली आहेत. डाव्या पक्षांचे उमेदवार सी. पी. प्रमोद यांना ३ हजार ९६२ मते मिळाली आहेत. आतापर्यंत मतमोजणी झालेल्या मतांपैकी तब्बल ५०.३६ टक्के मते ही भाजपा उमेदवार ई. श्रीधरन यांना मिळाली आहेत.
दरम्यान, केरळमध्ये पुन्हा एकदा डाव्या पक्षांची सत्ता येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ या डाव्या आघाडीने ९२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने ४५ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाचे उमेदवार २ जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे.
Official trends | 'Metro man' E Sreedharan, BJP candidate from Palakkad, leading from the constituency. #KeralaElections2021pic.twitter.com/398EajJbVB
— ANI (@ANI) May 2, 2021
केरळमध्ये विधानसभेच्या एकूण १४० जागा आहेत. बहुमतासाठी त्यापैकी ७१ जागांवर विजय मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, डाव्या पक्षांनी आतापर्यंतच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा कधीच ओलांडला आहे. दरम्यान, केरळमध्ये बऱ्याच वर्षांनंतर एक पक्ष आपली सत्ता कायम राखताना दिसत आहे.