Raj Thackrey: कोळी बांधव, वारकरी अन् ब्रास ब्रॅन्ड पथक विविध समस्या घेऊन ‘कृष्णकुंज’च्या राज दरबारी

By प्रविण मरगळे | Published: November 11, 2020 12:30 PM2020-11-11T12:30:16+5:302020-11-11T12:32:14+5:30

MNS Raj Thackeray News: आज राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी वारकरी, कोळी बांधव आणि मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड असोसिएशनच्या लोकांनी गर्दी केली

Koli, Warkari and Brass Brand Team meet MNS Chief Raj Thackrey over various problems | Raj Thackrey: कोळी बांधव, वारकरी अन् ब्रास ब्रॅन्ड पथक विविध समस्या घेऊन ‘कृष्णकुंज’च्या राज दरबारी

Raj Thackrey: कोळी बांधव, वारकरी अन् ब्रास ब्रॅन्ड पथक विविध समस्या घेऊन ‘कृष्णकुंज’च्या राज दरबारी

googlenewsNext
ठळक मुद्देकार्तिकी एकादशी जवळ आल्याने पंढरपूर मंदिर सुरु करावं अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहेएकादशी निमित्त वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का?; राज ठाकरेंचा सवाल मोठमोठे उत्सव, लग्न समारंभ बंद असल्याने ब्रास ब्रँन्ड व्यवसायिक अडचणीत

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवासस्थान कृष्णकुंज हे सर्वसामान्य जनतेसाठी समस्या मांडण्याचं ठिकाण बनलं आहे. राज दरबारी मांडलेली समस्या तात्काळ निकाली लागत असल्याचं चित्रही समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडे येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून मनसेकडून समस्या मार्गी लागतील अशी आशा लोकांना आहे.

आज राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी वारकरी, कोळी बांधव आणि मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड असोसिएशनच्या लोकांनी गर्दी केली, कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे, यात मंदिर उघडण्याची परवानगी अद्यापही सरकारने दिली नाही, कार्तिकी एकादशी जवळ आल्याने पंढरपूर मंदिर सुरु करावं अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. राज ठाकरेंनी ही समस्या सरकारकडे मांडावी यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा असं राज ठाकरेंना विनंती करण्यात आली. तेव्हा एकादशी निमित्त वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? त्यासाठी काय उपाययोजना करायल्या हव्या असं राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला विचारलं  

तर मुंबईतल्या कोळी बांधवांनी गावठाणाची जमीन मालकीवर दिली जात नाही अशी तक्रार घेऊन राज ठाकरेंना भेटत आहेत. त्याचसोबत सात-आठ महिन्यापासून लग्न व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे, मोठमोठे उत्सव, लग्न समारंभ बंद असल्याने ब्रास ब्रँन्ड व्यवसायिक अडचणीत आले आहेत, सगळीकडे अनलॉक करत असताना आमच्यावर बंदी का असं सवाल ब्रास बँन्ड पथकाने विचारला आहे, राज ठाकरेंकडे आमच्या समस्या मांडल्याने त्या सुटतील असा विश्वास या लोकांनी व्यक्त केला.

दरम्यान, सोमवारी मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील कलाकारांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती, ५० टक्के उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी ते नाट्य व्यावसायिकांनी परवडणारं नाही, सिनेसृष्टीला कोरोना काळात मोठा फटका बसला आहे, त्यामुळे या क्षेत्राला सरकारकडून मदत व्हावी यासाठी कलाकारांनी राज ठाकरेंकडे समस्या मांडली. लॉकडाऊन काळात विद्यार्थी पालक, केबल व्यावसायिक, जीम चालक-मालक, डॉक्टर्स, मुंबईचे डब्बेवाले, वाहतूकदार, पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ अशा अनेकांनी राज ठाकरेंकडे समस्या मांडली आणि या समस्या निकाली लागल्याचंही दिसून आलं होतं.  

Read in English

Web Title: Koli, Warkari and Brass Brand Team meet MNS Chief Raj Thackrey over various problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.