Krishna Sugar Factory election result: सत्ताधारी पुन्हा झाले कारभारी; कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:51 AM2021-07-02T07:51:28+5:302021-07-02T07:52:25+5:30

कारखान्याच्या निवडणुकीसाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार, डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत आणि अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल या तीन पॅनेलचे मिळून ६३ तर ३ अपक्ष असे एकूण ६६ उमेदवार रिंगणात होते.

Krishna Sugar Factory election result: Sahakar panel won all 21 the seats in karad | Krishna Sugar Factory election result: सत्ताधारी पुन्हा झाले कारभारी; कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजयी

Krishna Sugar Factory election result: सत्ताधारी पुन्हा झाले कारभारी; कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजयी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने सर्वच २१ जागांवर  विजय मिळविला. त्यामुळे सत्ताधारी सहकार पॅनेलच पुन्हा कारभारी झाल्याचे स्पष्ट झाले. (Krishna Sugar Factory election result declared.)


कारखान्याच्या निवडणुकीसाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार, डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत आणि अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल या तीन पॅनेलचे मिळून ६३ तर ३ अपक्ष असे एकूण ६६ उमेदवार रिंगणात होते. ४७ हजार १४५ मतदारांपैकी मयत मतदार वगळता ९१ टक्के मतदारांनी मंगळवारी मतदान केले. कऱ्हाड येथील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये गुरुवारी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच सत्ताधारी सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. सर्वात पहिल्यांदा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांची मते मोजण्यात आली. यामध्ये सहकार पॅनेलचे विलास भंडारे हे २० हजार ३३३ मते मिळवून विजयी झाले. इतर मागास प्रवर्ग गटातील सहकार पॅनेलचेच वसंतराव शिंदे २० हजार ३२६ मते मिळवून विजयी झाले तर भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गात अविनाश खरात यांनी २१ हजार १३४ मते मिळवून विजय संपादन केला. महिला राखीव प्रवर्गात सहकार पॅनेलच्या इंदूमती जाखले यांनी १९ हजार ५९४ तर जयश्री पाटील यांनी १९ हजार ८७६ मते मिळवत विजय मिळविला. वडगाव हवेली - दुशेरे गटात सहकार पॅनेलचेच धोंडीराम जाधव हे २० हजार ६५, जगदीश जगताप १९ हजार ५१३ तर सयाजी यादव १९ हजार ४०४ मते मिळवून या गटातून विजयी झाले.


कार्ले कार्वे गटातून सहकार  पॅनेलचे दयानंद पाटील २० हजार ३०७, गुणवंतराव पाटील १९ हजार ७२६ आणि निवासराव थोरात हे १९ हजार ७४७ मते मिळवून विजयी झाले. 

रेठरे हरणाक्ष बोरगाव गटातून सहकार पॅनेलचे जयवंत मोरे २० हजार १११, जितेंद्र पाटील २० हजार २१८ आणि संजय पाटील हे १९ हजार ७०० मते मिळवून विजयी झाले. 

नेर्ले तांबवे गटातून सहकार पॅनेलच्या दत्तात्रय देसाई २० हजार १०९, लिंबाजी पाटील १०३४७ तर संभाजीराव पाटील यांनी १९ हजार ८०१ मते मिळवत विजय संपादित केला. तर सहकार  पॅनेलचे नेते सुरेश भोसले यांनी रेठरे बुद्रुक शेणोली गटातून २० हजार २७८ तर बाजीराव निकम यांना १८ हजार ५३९ मते मिळवून विजयी झाले. 

येडे मच्छिंद्र वांगी गटातून सहकार पॅनेलचे शिवाजी पाटील २० हजार १५५ तर बाबासाहेब शिंदे हे १९ हजार ४८९ मते मिळवून विजयी झाले. 

संस्थापक आणि रयत पॅनेलला मात 
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चारीमुंड्या चित करण्याच्या इराद्याना उतरलेल्या संस्थापक पॅनेलचे अविनाश कदम आणि रयत  पॅनेलचे इंद्रजित मोहिते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अविनाश मोहिते यांना ९ हजार ९६१ तर इंद्रजित मोहिते यांना ४ हजार ७५१ मते मिळाली आहे.

Web Title: Krishna Sugar Factory election result: Sahakar panel won all 21 the seats in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.