ट्रॅक्टर अन् बुलडोझर; राकेश टिकैत-संजय राऊत भेटीवर कुणाल कामराचं हटके ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 08:50 AM2021-02-03T08:50:13+5:302021-02-03T10:23:51+5:30
'मिले सूर मेरा तुम्हारा" असं कॅप्शन देत कामराने राऊत-टिकैत भेटीचा फोटो ट्विट केलाय.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला शिवसेनाचा पाठिंबा दर्शवला. या भेटीवर कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने हटके ट्विट केलं आहे. संजय राऊत आणि राकेश टिकैत यांच्या भेटीच्या फोटोखाली कामराने ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो जोडला आहे. ''मिले सूर मेरा तुम्हारा" असं कॅप्शन देत कामराने राऊत-टिकैत भेटीचा फोटो ट्विट केलाय.
कॉमेडियन कुणाल कामराचा 'शट अप या कुणाल' हा यूट्यूब शो अतिशय प्रसिद्ध आहे. कोरोना काळात काही कारणास्तव कुणालचा हा कार्यक्रम बंद झाला होता. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कुणाल कामराने संजय राऊत यांच्या मुलाखतीपासून हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला होता. यासाठी कुणालने संजय राऊत यांची भेटही घेतली होती. संजय राऊत यांच्या मुलाखतीवेळी कुणालने संजय राऊत यांना बुलडोझरची प्रतिकृती भेट म्हणून दिला होती.
Mile sur mera tumhara... pic.twitter.com/siis8YMByV
— Kunal Kamra (@kunalkamra88) February 2, 2021
विमानात पुन्हा अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा समोरासमोर आले अन्...
संजय राऊत यांनी राज्यात ज्यापद्धतीनं भाजपला धोपीपछाड देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं आणि सातत्यानं भाजपवर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर कुणालने राऊत यांना बुलडोझरची उपमा दिली होती. दुसरीकडे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो शेतकरी आपल्या ट्रक्टरसर गाझीपूर सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली देखील आयोजित करण्यात आली होती.
कुणाल कामरा पुन्हा चर्चेत, 'लाच' देण्यासाठी पोहोचला राज ठाकरेंच्या घरी...
दरम्यान, संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काल गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत आणि शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी राऊत यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाने उपस्थित होते. "संपूर्ण देश आज शेतकऱ्यांसोबत उभा आहे. महाराष्ट देखील शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आम्ही आज शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येथे टिकैत यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत", असं संजय राऊत म्हणाले होते.