नरेंद्र मोदींना शेवटची 2002 मध्ये भेटलेली, त्यांचा नावाचा 'त्रास'; पुतणी सोनल मोदी यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 08:47 PM2021-02-13T20:47:06+5:302021-02-13T20:50:35+5:30
Narendra modi's niece Sonal Modi Reacted on Relations with Prime minister : नरेंद्र मोदी यांची पुतणी म्हणून मला तिकीट नाकारले गेले तर मला खूप दु:ख होईल, जर माझ्यापेक्षा जास्त चांगले कार्यकर्ते असतील आणि त्यांना तिकीट दिले तर मला वाईट वाटणार नाही, असे सोनल यांनी सांगितले.
माझ्या वडिलांचे नाव प्रल्हाद मोदी पाहिले आणि त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणी आहात. मी तिकिट देणाऱ्या भाजपाच्या नेत्याला म्हटले की, प्रल्हाद मोदी हे त्यांचे भाऊ आहेत, परंतू मी माझ्या कामावर तिकिट मागत आहे. मोदींनी कधी मिडीयासमोर सांगितले की ही माझी पुतणी आहे, हा भाचा आहे, असा सवाल मोदींची पुतणी सोनल मोदी (Sonal Modi) यांनी केला आहे. त्या अहमदाबादच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तिकीट मागण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना तिकीट नाकारण्यात आले. (Narendra modi's niece Sonal Modi Fails To Get BJP Ticket To Contest Ahmedabad Civic Polls)
नरेंद्र मोदी यांची पुतणी म्हणून मला तिकीट नाकारले गेले तर मला खूप दु:ख होईल, जर माझ्यापेक्षा जास्त चांगले कार्यकर्ते असतील आणि त्यांना तिकीट दिले तर मला वाईट वाटणार नाही, असे सोनल यांनी सांगितले. पक्षाने नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिट दिले जाणार नाही असे जाहीर केले आहे. गुजरातमध्ये असे झाले आहे, त्याचे उत्तर प्रदेशाध्यक्षच देऊ शकतील, असे सोनल यांनी म्हणत भाजपाच्या या पक्षपातीपणावर सवाल उपस्थित केला. बीबीसीने सोनल मोदी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मोदींसोबतचे नाते, त्यांचा होणारा फायदा याबद्दल मोठे गौप्यस्फोट केले.
मी भाजपाची सक्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला तिकीट देण्यात यावे असे मी भाजपाच्या निवड समितीला सांगितले होते. मोदींच्या नावामुळे मी चर्चेत आले. परंतू जर तिकिट दिले असते, मी सोनल मोदी आहे हे लोकांना समजले असते. मोदींच्या नावामुळे मला कामाच्या ठिकाणीही त्रास होतो. लोक विचारतात तुम्हाला काम करायची काय गरज? असे म्हणत निघून जातात. मोदी पंतप्रधान असल्याचा फायदा कुटुंबातील कोणालाच होत नाही, आम्ही आमचे सामान्य जीवन जगतो. जेव्हा ते त्यांची आई हिराबेन यांना भेटायला जातात तेव्हा तिथे कोणी नसते. मोदी आणि हिराबेन असतात. आम्हाला तिथे येण्यास मोदींनीच मनाई केली होती. तो त्यांचा विचार असल्याचे, सोनल म्हणाल्या.
मोदींना मी शेवटची ते मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये भेटलेली. फॅमिली गेटटुगेदर होते. १० मिनिटे बोलणे झाले होते. त्यांनी आम्हाला कोणालाच पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा बोलवले नाही, याचे वाईट वाटले, असे त्या म्हणाल्या. मोदी पंतप्रधान असल्याचा मला आनंद आहे. आमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर आहे, याचा आनंद आहे, असेही त्या म्हणाल्या.