दक्षिणेतील बाळासाहेबांनी आणली जान, द्रविडी आंदोलनाशी नाते; निम्म्या जागांवर महिलांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 04:59 AM2021-03-16T04:59:40+5:302021-03-16T05:00:43+5:30
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ टक्के मते मिळवणारा एनटीके द्रविडी आंदोलनाशी नाते सांगत असल्याने तो यंदा प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तामिळ संस्कृती, तामिळ भाषा आणि त्यांची अस्मिता हा एकमेव अजेंडा घेऊन एनटीकेने जनतेला साद घातली आहे.
चेन्नई : अण्णा द्रमुक, द्रमुक, काँग्रेस, भाजपसह डझनभर पक्षांनी तामिळनाडू विधानसभेच्या आखाड्यात आपली शस्त्रास्त्रे पाजळली असतानाच आता तामिळनाडूची प्रादेशिक अस्मिता जपण्याचा दावा करणाऱ्या नाम तमिलर काची (एनटीके)नेही २३४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यातील निम्म्या जागांवर महिलांना संधी दिली आहे. (Life brought by Balasaheb in the south, relationship with Dravidian movement; Opportunity for women in half the seats)
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ टक्के मते मिळवणारा एनटीके द्रविडी आंदोलनाशी नाते सांगत असल्याने तो यंदा प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तामिळ संस्कृती, तामिळ भाषा आणि त्यांची अस्मिता हा एकमेव अजेंडा घेऊन एनटीकेने जनतेला साद घातली आहे. एकेकाळी चित्रपट दिग्दर्शक असणाऱ्या सेंदामिळन सिमन यांनी २००९ मध्ये एनटीकेची स्थापना केली होती. सिमन हे तामिळनाडूच्या राजकारणात वारंवार प्रादेशिक हुंकार जोपासत असतात. त्यामुळे ते तामिळनाडूचे बाळ ठाकरे म्हणून ओळखले जातात.
तामिळ हे हिंदू नाहीत
- तामिळ हे हिंदू नाहीत. तामिळींची स्वतंत्र संस्कृती आहे, त्यांना ब्रिटिशांनीच हिंदूंशी जोडले असल्याचा दावा सिमन करत असतात, मात्र सिमन तामिळ लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप विराेधक करीत आहेत.
- एनटीकेने उपस्थित केलेल्या पारंपरिक तामिळ संस्कृतीच्या मुद्द्यामुळे प्रमुख पक्षांची अडचण झाली आहे.