बिहारमध्ये NDAत उभी फूट, लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक

By बाळकृष्ण परब | Published: October 4, 2020 06:06 PM2020-10-04T18:06:47+5:302020-10-04T18:11:00+5:30

Bihar Assembly Election 2020 Marathi News : लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

The LJP will not contest Election under the leadership of Nitish Kumar | बिहारमध्ये NDAत उभी फूट, लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक

बिहारमध्ये NDAत उभी फूट, लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक

googlenewsNext
ठळक मुद्देलोकजनशक्ती पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची केली घोषणा लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याबाबतचा घेण्यात आला निर्णय मात्र राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि लोकजनशक्ती पार्टीची आघाडी मजबूत असेल

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी एनडीएमध्ये उभी फूट पडली आहे. सुरुवातीपासूनच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला विरोध करणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झाली. या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक न लढवण्याचा आणि लोजपा भाजपा सरकारचा प्रस्ताव पारित कण्यात आला. लोजपाचे सर्व आमदार मोदींचे हात बळकट करतील, असे ठरवण्यात आले.

याबाबत लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस अब्दुल खालिक यांनी बैठकीबाबत माहिती देताना सांगितले की, वैचारिक मतभेदांमुळे लोकजनशक्ती पार्टी जनता दल युनायटेडसोबत बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मात्र राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि लोकजनशक्ती पार्टीची आघाडी मजबूत असेल.

अब्दुल खालिक यांनी सांगितले की, बिहार विधासभेच्या काही जागांवर लोकजनशक्ती पार्टीची जेडीयूसोबत वैचारिक लडाई होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे त्या जागांवर जनतेला कुठला उमेदवार हा बिहारच्या हिताबाबत उपयुक्त आहे याची निवड करता येईल. दरम्यान, लोकजनशक्ती पार्टी बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट व्हिडन डॉक्युमेंट लागू करण्याच्या विचारात होती. मात्र त्यावर एकमत होऊ शकले नाही. केंद्राप्रमाणेच बिहारमध्येसुद्धा भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार बनावे, अशी लोकजनशक्ती पार्टीची इच्छा आहे. आता लोकजनशक्ती पार्टीचा प्रत्येक आमदार भाजपाच्या नेतृत्वाखाली बिहारला फर्स्ट बनवण्यासाठी प्रयत्न करेल, अशी घोषणा लोकजनशक्ती पार्टीने केली आहे.

तेजस्वी यादव करणार महाआघाडीचं नेतृत्त्व

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीने शनिवारी जागा वाटप जाहीर केले. सर्व पक्षांनी तेजस्वी यादव यांना आघाडीचे नेते म्हणून समर्थन दिले. या आघाडीत २४३ सदस्यीय विधानसभेत राजद १४४, काँग्रेस ७० जागा लढविणार आहे. माकपा ६, भाकपा ४ आणि भाकपा (माले) यांना १९ जागा देण्यात आल्या आहेत.

या जागावाटपाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच व्हीआयपी पार्टीचे नेते मुकेश सहनी यांनी आपल्या पक्षाला जागा न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि महाआघाडीतून वेगळे होत असल्याची घोषणा केली. राजदने आम्हाला धोका दिला, असा आरोपही त्यांनी केला होता.

तेजस्वी यादव म्हणाले की, जनादेशाचा अपमान करणाऱ्यांना लोक धडा शिकवतील. दहा लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आघाडीत झालेल्या चर्चेनुसार वाल्मिकीनगर लोकसभा जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार उभा करणार आहे. २०१५ मध्ये राजद, काँग्रेस आणि जदयू यांनी एकत्र निवडणूक लढविली होती. मात्र, नंतर नितीशकुमार यांनी भाजपसोबत युती केली.

Web Title: The LJP will not contest Election under the leadership of Nitish Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.