LMOTY 2020: गृहमंत्रिपदावर आणखी किती काळ राहणार? अनिल देशमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:19 PM2021-03-18T15:19:31+5:302021-03-19T10:39:25+5:30

Home Minister Anil Deshmukh: या सगळ्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखही जबाबदार आहेत असा आरोप भाजपाने केला होता. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे

LMOTY 2020: How much longer will you be the Home Minister? Anil Deshmukh said in clear words. | LMOTY 2020: गृहमंत्रिपदावर आणखी किती काळ राहणार? अनिल देशमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलं

LMOTY 2020: गृहमंत्रिपदावर आणखी किती काळ राहणार? अनिल देशमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलं

Next
ठळक मुद्देनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या शेवटच्या कोपऱ्यात असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी आणि माझ्या पत्नीने दिवाळी साजरी केली होतीमहाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे, कोणीही किती प्रयत्न केले तरीही सरकार पडणार नाहीअलीकडेच दिल्लीत पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं आहे

मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली(Mukesh Ambani Bomb Scare) होती, या प्रकरणात सचिन वाझे यांना NIA ने अटक केली, त्यामुळे मुंबई पोलीस(Mumbai Police) दलाची प्रतिमा मलीन झाली, सचिन वाझे यांच्यावर ठाकरे सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे, त्यानंतर राज्यातील पोलीस दलातही मोठे फेरबदल करण्यात आले, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh) यांची उचलबांगडी करून त्यांच्याजागी हेमंत नगराळे(Hemant Nagrale)यांना पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.(Home Minister Anil Deshmukh Interview on Various Issue in Lokmat Maharashtrian of The Year Awards Function)  

मात्र या सगळ्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखही जबाबदार आहेत असा आरोप भाजपाने केला होता. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे तशी सरकारमधील काही नेत्यांनीही अनिल देशमुखांना गृहमंत्री पदावरून हटवावं अशी मागणी केली आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रिपदावर टांगती तलवार आहे, देशमुख यांचे गृहमंत्री पद पुढील वर्षभर कायम राहणार का? असा प्रश्न त्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर(Lokmat Maharashtrian of The Year) मध्ये विचारण्यात आला, तेव्हा अनिल देशमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, जोपर्यंत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांचा आदेश आहे तोपर्यंत मी गृहमंत्री राहणार आहे. अलीकडेच दिल्लीत पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं आहे, त्यामुळे माझं गृहमंत्रीपद जाणार नाही हे नक्की असल्याचा विश्वास अनिल देशमुखांनी व्यक्त केला.

भाजपा पाहतंय मंगुरीलाल के सपने

विरोधी पक्ष भाजपा(BJP) सत्ता गेल्याने इतके अस्वस्थ आहेत की अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी(Congress-NCP) आणि शिवसेनेची(Shivsena) सत्ता आहे ते त्यांना खरं वाटतं नाही, भाजपा मंगुरीलाल के सपने पाहत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे, कोणीही किती प्रयत्न केले तरीही सरकार पडणार नाही, महाविकास आघाडीत चांगल्या पद्धतीन समन्वय ठेऊन काम करतेय, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना सरकार २ महिन्यात पडणार, ३ महिन्यात पडणार असं बोलावं लागतं असं सांगत अनिल देशमुखांनी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

पंतप्रधान सीमेवर दिवाळी साजरी करतात तर मी....

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) सीमेवर जाऊन दिवाळी साजरी करतात, मग तुम्ही दिवाळीत कुठे असता? असा प्रश्न लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा(Vijay Darda) यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना विचारला होता, त्यावर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या शेवटच्या कोपऱ्यात असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी आणि माझ्या पत्नीने दिवाळी साजरी केली होती. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली असं म्हटलं, त्याचसोबत गडचिरोलीत अलीकडेच ५३५ गावात निवडणुका झाल्या, तिथे १ हजारापेक्षा जास्त केंद्रावर मतदान झालं, ८१ टक्के मतदानाची टक्केवारी होती, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडला नाही, फक्त या प्रकरणामुळे महाराष्ट्र पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू नका असं आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं.   

Web Title: LMOTY 2020: How much longer will you be the Home Minister? Anil Deshmukh said in clear words.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.