LMOTY 2020: 'त्या' चुका गंभीर, माफ करण्यालायक नाहीत; गृहमंत्र्यांनी सांगितलं पोलीस आयुक्तांच्या बदलीमागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:36 PM2021-03-18T15:36:57+5:302021-03-19T10:39:10+5:30
Anil Deshmukh talk on Parambir Singh transfer: स्फोटक कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना अटक केल्यापासून एनआयएकडून परमबीर सिंग यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे.
अँटिलिया समोर स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर वाझेंचे निलंबनही करण्यात आले. आता या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असून बुधवारी या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. (CP Office mistakes are not unforgivable; Anil Deshmukh told why action taken on Parambir Singh.)
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' (Lokmat Maharashtrian of the year award 2020) सोहळ्याला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आले होते. त्यांनी मंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीचे कारण सांगितले आहे. पोलीस महासंचालकांना पोलीस आयुक्त पदावर आणण्यात आले आहे. परमबीर सिंग यांना मोहरा बनविल्याचे आरोप विरोधक करत आहेत. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच खुलासा केला आहे. सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त यांची बदली ही प्रशासकीय बदली नाही. ती कारवाई आहे. चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या. अक्षम्य अशा त्या गोष्टी आहेत. त्या समजल्याने या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. चौकशीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
मुंबई पोलिसांचे प्रमुख. पोलीस आयुक्तालाच्या सहकाऱ्यांच्या ज्या गंभीर चुका झाल्या त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. एनआयए आणि एटीएसच्या चौकशीत जे समोर येईल त्यावरून त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले.
पोलीस दलात चर्चा काय?
स्फोटक कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना अटक केल्यापासून एनआयएकडून परमबीर सिंग यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांना आयुक्त पदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा गृह विभागात सुरु आहे. पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदारीमध्ये अनपेक्षितपणे इतक्या मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत.