Lok Sabha Election 2019: ‘पार्थ’ही मागे फिरेल, ‘सुप्रियाताई’ही पडतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 07:05 AM2019-03-15T07:05:02+5:302019-03-15T07:05:36+5:30

चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

Lok Sabha Election 2019: 'Partha' will also go back, 'Supriyatai' will fall | Lok Sabha Election 2019: ‘पार्थ’ही मागे फिरेल, ‘सुप्रियाताई’ही पडतील

Lok Sabha Election 2019: ‘पार्थ’ही मागे फिरेल, ‘सुप्रियाताई’ही पडतील

Next

गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला जमले नाही ते आम्ही चार वर्षात करून दाखविले आहे. त्यामुळे खोटे बोलून मते मिळणार नाहीत हे उमगल्यामुळेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली आहे. पहिल्यावेळीच पराभव पत्करून राजकीय कारकीर्दीची सुरूवात करता येणार नाही म्हणून ‘पार्थ’देखील मागे फिरेल. पराभव समोर दिसतानाही सुप्रियाताई सुळे लढतील. मात्र, त्याही पडतील अशी भविष्यवाणी राज्याचे महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी केली.

गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल महसूलमंत्री पाटील यांच्यासह ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याहस्ते गुरुवारी सत्कार झाला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. तोपर्यंत जनतेला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्यानंतरच माणसांच्या विकासावर पैसे खर्च करता येतील.

रस्तेबांधणी, मेट्रो व बुलेट ट्रेनबरोबरच अर्धवट राहिलेली धरणे पूर्ण करून कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्याबरोबरच शेतीमजुरीचा कामाचा रोजगार हमीच्या कामात समावेश करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Lok Sabha Election 2019: 'Partha' will also go back, 'Supriyatai' will fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.