8-10 जागा मिळवणारेदेखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहताहेत- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:56 PM2019-05-16T13:56:50+5:302019-05-16T14:06:31+5:30
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
चंदोली: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर शरसंधान साधलं आहे. स्वप्न पाहणं चुकीचं नाही. पण अबकी बार मोदी सरकार हे जनतेनं मनाशी ठरवलं आहे, असं मोदी उत्तर प्रदेशातल्या चंदोलीमधल्या जनसभेला संबोधित करताना म्हणाले.
ज्यांच्या 8-10, 20-22, 30-35 जागा निवडून येतात, तेदेखील आता पंतप्रधान होण्याची स्वप्नं पाहू लागले आहेत, असा टोला लगावत मोदींनी महाआघाडीतल्या अनेक नेत्यांना लक्ष्य केलं. स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही. पण यंदा मोदी सरकारच येणार, हे जनतेनं ठरवलं आहे, असं मोदींनी म्हटलं. देशाला स्थिर सरकार कसं देणार याचं उत्तर अद्याप विरोधकांच्या आघाडीला सापडलेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी महाआघाडीला लक्ष्य केलं. विरोधकांची महाआघाडी महामिलावट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
PM Narendra Modi in Chandauli: Those with 8 seats, 10 seats, 20-22 seats, 30-35 seats are dreaming of becoming Prime Minister, but the country is saying-phir ek baar Modi sarkar pic.twitter.com/PjKUxS8liG
— ANI UP (@ANINewsUP) May 16, 2019
दहशतवादाच्या मुद्द्यावर सरकारचं धोरण स्पष्ट असल्याचं मोदी म्हणाले. 'देशाच्या जवानांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारू. भारतात राहून पाकिस्तानचे गुण गाणाऱ्या फुटीरतावाद्यांना आम्ही कठोरपणे हाताळत आहोत,' असं मोदींनी म्हटलं. यावेळी त्यांनी पूर्वांचलमधल्या शेतकऱ्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. 'पूर्वांचलमधल्या शुगर फ्री तांदळाची खूप चर्चा होत आहे. वाराणसीत आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र उभारण्यात आलं आहे. चांगलं बियाणं निवडण्यासाठी, पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना या केंद्राची मदत होईल,' असं मोदी म्हणाले.