अखेर मोदींनी पत्रकार परिषद घेतली, पण एकटेच बोलले... पत्रकारांचे प्रश्न टाळले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:40 PM2019-05-17T17:40:08+5:302019-05-17T17:42:54+5:30

पत्रकारांच्या प्रश्नांना अमित शहांनी दिली उत्तरं

lok sabha election 2019 pm modi took press conference after 5 years but did not respond to single question | अखेर मोदींनी पत्रकार परिषद घेतली, पण एकटेच बोलले... पत्रकारांचे प्रश्न टाळले!

अखेर मोदींनी पत्रकार परिषद घेतली, पण एकटेच बोलले... पत्रकारांचे प्रश्न टाळले!

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर आज पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान झाल्यानंतरची मोदींची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. मात्र या पत्रकार परिषदेत मोदी एकटेच बोलले. पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी उत्तर दिली. मोदींनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असंदेखील शहा पत्रकार परिषदेत म्हणाले.




पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित करताना सर्वच प्रश्नांची उत्तरं शहांनी दिली. पंतप्रधानांना विचारण्यात आलेला एक प्रश्न त्यांनी मोठ्या खुबीनं शहांकडे टोलवला. 'मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील,' असं मोदी म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकारानं एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तरं देण्याची आवश्यकता नाही, असं शहांनी म्हटलं.




भाजपाच्या पत्रकार परिषदेला अमित शहांनी सुरुवात केली. त्यांनी मोदी सरकारच्या योजनांची विस्तृत माहिती दिली. यानंतर मोदींनी पत्रकारांशी बोलण्यास सुरुवात केली. 'आधी माझं हेच काम असायचं. संध्याकाळी पक्ष कार्यालयात यायचं. पत्रकार मित्रांशी संवाद साधायचा. आज दिवसभर मध्य प्रदेशात होतो. त्यामुळे येण्यास उशीर झाला,' असं मोदी सुरुवातीला म्हणाले. लोकसभा निवडणूक सुरू असताना आयपीएल, रमजानदेखील झाला. हीच लोकशाहीची ताकद असल्याचं मोदींनी म्हटलं.




आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून निवडणुकीला सामोरे गेलो. जनता पुन्हा एकदा बहुमत देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच पक्षाचं बहुमताचं सरकार केंद्रात सत्तेत पुन्हा येणार, हे कित्येक वर्षांनंतर देशात घडेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. देशातल्या जनतेनं गेल्या पाच वर्षांत कायम साथ दिली. अनेक चढ-उतार आले. पण देश कायम सरकारच्या पाठिशी राहिला, असं म्हणत मोदींनी देशवासीयांचे आभार मानले.

Web Title: lok sabha election 2019 pm modi took press conference after 5 years but did not respond to single question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.