Video: उत्तर प्रदेशातून माणसं आणून कुत्र्यासारखं मारेन; भाजपा उमेदवाराची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 11:53 AM2019-05-05T11:53:13+5:302019-05-05T11:56:42+5:30
धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कोलकाता: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पूर्ण झाला आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का देण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे. कधीकाळी ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या माजी पोलीस अधिकारी भारती घोष यांना भाजपानं घाटल लोकसभा मतदासंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानं घोष वादात अडकल्या आहेत.
जास्त हुशारी दाखवलीत, तर उत्तर प्रदेशातून माणसं बोलावून कुत्र्यासारखं मारेन, अशी धमकी भारती घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना दिली. तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी सौजन्यानं वागा, मर्यादा सोडू नका, असं आवाहन केल्यानंतर घोष यांचा धमकी देत असतानाच व्हिडीओ समोर आला. 'स्वत:च्या घरात जा. जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे लपण्यासाठी कोणतीही जागा नाही. मी तुम्हाला घरातून बाहेर काढून कुत्र्यासारखं मारेन. तुम्हाला मारण्यासाठी उत्तर प्रदेशातून हजारो माणसं आणेन,' अशी धमकी घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना दिली.
#WATCH:BJP candidate from Ghatal, WB & ex IPS officer Bharati Ghosh threatens TMC workers,says,"You are threatening people to not cast their votes. I will drag you out of your houses and thrash you like dogs. I will call a thousand people from Uttar Pradesh to beat you up." (4/5) pic.twitter.com/GvX650F6n9
— ANI (@ANI) May 5, 2019
या प्रकरणी तृणमूल काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं पक्षाचे नेते पार्थ चॅटर्जी यांनी सांगितलं. घोष यांनी घाटल मतदारसंघात प्रचारादरम्यान तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट धमकी दिली. याआधी पोलीस सेवेत असताना त्यांच्याकडे याच भागाच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी होती. निवडणूक आयोगानं या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. आयोगानं कोणाच्याही तक्राराशिवाय घोष यांच्या विधानाची दखल घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.