Video: सोमय्यांचं ते वाक्य राष्ट्रवादीनं उचललं; प्रचाराच्या गाण्यात वापरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 07:10 PM2019-04-13T19:10:10+5:302019-04-13T19:17:15+5:30

सोमय्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल 

lok sabha election bjp leader kirit somaiya files complaint at election officer for using his statement in ncp candidates campaign video | Video: सोमय्यांचं ते वाक्य राष्ट्रवादीनं उचललं; प्रचाराच्या गाण्यात वापरलं

Video: सोमय्यांचं ते वाक्य राष्ट्रवादीनं उचललं; प्रचाराच्या गाण्यात वापरलं

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे

मुंबई : खासदार किरीट सोमय्या यांच्या 'भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल...' या वाक्याचा वापर करुन राष्ट्रवादीनं प्रचारगीत तयार केलं आहे. राष्ट्रवादीचे ईशान्य मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारगीतात किरीट सोमय्यांचं विधान वापरण्यात आलं आहे. हे विधान सोमय्यांनी भाजपा उमेदवार मनोज कोटक यांना उद्देशून केलं होतं. याबद्दल सोमय्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, भांडूप पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

भाजपाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी दिल्यानंतर, सोमय्यांनी त्यांचा लहान भाऊ असा उल्लेख केला होता. माझा भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल, असं सोमय्या म्हणाले होते. राष्ट्रवादीचे उमेदवारी संजय दिना पाटील यांना भाऊ म्हटलं जातं. त्यामुळे सोमय्यांच्या याच वाक्याचा वापर करत, पुढे संजय पाटील यांची छायाचित्रे वापरुन 'अरे आला.. आपला भाऊ भाऊ...’ असे शब्द असलेला व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ  सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. 



या व्हिडीओचा वापर आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केला जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी सोमय्यांनी उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. संबंधिताचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार, भांडूप पोलीस व्हिडीओ तयार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Web Title: lok sabha election bjp leader kirit somaiya files complaint at election officer for using his statement in ncp candidates campaign video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.