"भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचं जनतेनं मनोमन ठरवलंय"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 16:59 IST2019-04-02T16:56:37+5:302019-04-02T16:59:55+5:30
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे.

"भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचं जनतेनं मनोमन ठरवलंय"
संभल- समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वच जागांवर सपा-बसपा आणि रालोदचं गठबंधन विजय मिळवणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्याचं जनतेनं मनोमन ठरवून टाकलंय. पत्रकारांनी बोलताना नरेश उत्तम म्हणाले, भाजपानं देशाला धोका द्यायचं काम केलं आहे. बेरोजगारांना अद्याप नोकरी दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीही अद्याप लागू करण्यात आलेल्या नाहीत. देशातील शेतकरी आणि बेरोजगार जास्त त्रासलेले आहेत. उत्तर प्रदेशमधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं अद्यापही 15 हजार कोटी रुपयांची भरपाई दिलेली नाही. शेतकऱ्यांनी त्याची मागणी केल्यास त्यांना दिल्लीत लाठीमार सहन करावा लागला. काही महिन्यांपूर्वीच आम्ही फुलपूर, कैराना, गोरखपूर या जागांच्या पोटनिवडणुकीत आणि नूरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केला आहे. त्यामुळे जनतेला भाजपा सरकार पुन्हा सत्तेत नको आहे, हे स्पष्ट झालेलं आहे.