धक्कादायक! लालूंच्या पक्षाच्या आमदारानं मसूद अजहरला 'साहेब' म्हटल्यानं उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 08:58 PM2019-03-31T20:58:10+5:302019-03-31T20:59:21+5:30

लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

lok sabha election rjd mla haji subhan in kishanganj says terrorist masood azhar as sahab | धक्कादायक! लालूंच्या पक्षाच्या आमदारानं मसूद अजहरला 'साहेब' म्हटल्यानं उडाली खळबळ

धक्कादायक! लालूंच्या पक्षाच्या आमदारानं मसूद अजहरला 'साहेब' म्हटल्यानं उडाली खळबळ

किशनगंजः लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. अशातच बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदारानं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला साहेब म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी मंचावर आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते.

किशनगंज येथे सभेदरम्यान आरजेडीचे आमदार हाजी सुभान यांच्या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये हाजी सुभान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी मसूद अजहर साहेबांना चीननं विटो लावून वाचवलं. चीननं मसूद अझहर साहेब दहशतवादी नसल्याचं सांगत व्हिटोचा वापर केला. त्यामुळे त्याचं नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत आलं नाही. आतापर्यंत चीनसंदर्भात मोदींनी एक शब्ददेखील उच्चारला नाही. 50 हजार कोटींचं वर्षाला चीनकडे जात असल्यावरही ते रोखण्यासाठी आतापर्यंत कोणीही नेता पुढे आलेला नाही.


आरजेडी आमदाराचा हा व्हिडीओ 29 मार्च रोजीचा असल्याचं सांगितलं जातंय. या वर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला, तीन वर्षांपूर्वी पठाणकोट आणि 2001मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात दहशतवादी जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरचं नाव पुढे आलं आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक करत अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. किशनगंज या मुस्लिमबहुल लोकसभा मतदारसंघातून जेडीयू नेते महमूद अशरफ निवडणुकीच्या रिंगणात आहे. इथे दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान होणार आहे. 

Web Title: lok sabha election rjd mla haji subhan in kishanganj says terrorist masood azhar as sahab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.