Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:58 PM2024-10-23T18:58:23+5:302024-10-23T18:59:04+5:30

Madha vidhan sabha history: माढा विधानसभा मतदारसंघात काही अपवाद वगळले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. 

Madha Vidhan Sabha history four times Congress mla, five times NCP mla, Shekap got a chance once! | Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!

Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!

लक्ष्मण कांबळे 
माढा विधानसभा मतदारसंघावर राज्य स्थापनेनंतर आतापर्यंत झालेल्या एकूण १३ सार्वजनिक निवडणुकीत काँग्रेस चार, शेकाप एक, अपक्ष तीन व उर्वरित पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघावर अपक्ष व शेकाप पक्षाचे चार आमदार वगळता कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत सलग पाच वेळा या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अबाधित राहिली आहे. १९५२ मध्ये मुंबई प्रांताचे आमदार म्हणून शेकापचे बाबूराव पाटील व १९५७ मध्ये काँग्रेसचे नामदेव जगताप यांनी या मतदारसंघाचे काम पाहिले आहे. 

एकाही आमदाराला मिळाली नाही मंत्रि‍पदाची संधी

गेल्या १३ पंचवार्षिक निवडणुकीत या मतदारसंघाने वेगवेगळे आमदार दिले आहेत. यामध्ये १९९५ निवडणुकीतून अपक्षसह सलग सहा वेळा आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. माढा विधानसभा मतदारसंघात राज्य स्थापनेपासून एकदाही शिवसेनेचा भगवा फडकला नाही. 

त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघात एकदाही महिलेला आमदार म्हणून संधी मिळालेली नाही. याचबरोबर या मतदारसंघातून निवडून आलेल्या कोणत्याही आमदाराला मंत्रिपदाची देखील संधी मिळालेली नाही. २००९ च्या निवडणुकीपासून माढा तालुक्याचा मतदारसंघ फुटून माढा ७८, पंढरपूर ४२ व माळशिरस १४ अशा एकूण १३४ गावांचा माढा विधानसभा मतदारसंघ झाला आहे.

१९६२ ते २०१९ माढात कधी कोण जिंकलं?

१९६२ च्या विनयकीये काँग्रेसने काशीनाथ अस्वरे हे विजयी झाले होते. त्यानंतर १९६७ मध्ये शेकापचे उमेदवार संपतराव पाटील विजयी झाले. यानंतर १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे विठ्ठलराव शिंदे हे निवडून आले. १९७८ मध्ये अपक्ष उमेदवार कृष्णाराव परबत यांनी बाजी मारली होती. 

१९८० च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावरून धनाजीराव साठे हे, तर १९८५ मध्ये अपक्ष उमेदवार पांडुरंग पाटील हे विजय झाले होते. त्यानंतर १९९० च्या दशकात पांडुरंग पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत दुसऱ्यांदा आमदारकीची संधी मिळवली होती. यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून बबनराव शिंदे यांनी १९८५ च्या सार्वजनिक निवडणुकीत आपल्या सभापतीपदाच्या कालावधीनंतर निवडणुकीत प्रवेश केला आणि त्यांनी आमदारकी मिळवली.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सलग पाचवेळा आमदार

राज्यात १९९९ च्या दरम्यान काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि शरद पवार यांनी वेगळा पक्ष काढून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यादरम्यान तालुक्याचे अपक्ष असणारे आमदार बबनदादा शिंदे हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतःला उमेदवारी मिळवून विजयी झाले, तेव्हापासून आमदार बबनराव शिंदे यांनी २००४, २००९, २०१४, २०१९ अशी सलग पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून माढा विधानसभेवरती अबाधित सत्ता ठेवली आहे. 

आमदार बबनदादा शिंदे यांची एकूण सहा टर्म माढा विधानसभेतील सत्ता प्रस्थापित आहे. मुख्यमंत्री म्हणून (कै.) विलासराव देशमुख हे राज्यात कार्यरत असताना त्यांनी आपल्या मैत्रीचा मोबदला म्हणून धनाजीराव गणपत साठे यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल केली होती.

Web Title: Madha Vidhan Sabha history four times Congress mla, five times NCP mla, Shekap got a chance once!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.