बालेकिल्ला राखण्याचे महायुतीपुढे आव्हान, काँग्रेसचा दुणावलेला आत्मविश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:23 PM2024-10-29T16:23:42+5:302024-10-29T16:24:39+5:30

Assembly election 2024 Maharashtra: राज्याच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही रंगदार लढती होताना दिसत आहे. 

Maharashtra Assembly election 2024 mahayuti maha vikas Aghadi Gadchiroli | बालेकिल्ला राखण्याचे महायुतीपुढे आव्हान, काँग्रेसचा दुणावलेला आत्मविश्वास!

बालेकिल्ला राखण्याचे महायुतीपुढे आव्हान, काँग्रेसचा दुणावलेला आत्मविश्वास!

संजय तिपाले,गडचिरोली 
Maharashtra Assemblye elction 2024 : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तिन्ही विधानसभा क्षेत्रात सध्या महायुतीचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे महायुतीपुढे बालेकिल्ला शाबूत राखण्याचे कडवे आव्हान आहे.

महायुतीत आरमोरी व गडचिरोली मतदारसंघ भाजपकडे, अहेरी अजित पवार गटाकडे आहे. महाविकास आघाडीमध्ये आरमोरी व गडचिरोलीची जागा काँग्रेसला सुटली आहे. अहेरीची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला गेली आहे. गडचिरोलीत आमदार डॉ. देवराव होळी यांचे भाजपने पंख छाटले आहेत. काँग्रेसनेही नवे चेहरे दिले आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे 

- रोजगाराची अपुरी साधने, उच्चशिक्षणाच्या अल्प संधी, बेरोजगारीचा वाढता लोंढा हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

- पायाभूत सुविधांचा बॅकलॉग भरून निघालेला नाही. त्यामुळे आरोग्यसेवेत अडसर येतो, हा मुद्दा सत्ताधाऱ्यांसाठी अडसर आहे. 3 वनोपज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, पण यावर आधारित उद्योग, व्यवसायांना गती नाही. 

- वनपट्ट्यांचे रखडलेले प्रस्ताव, उद्योग- व्यवसायांसाठी अडसर ठरत असलेले वनकायदे हे प्रश्नही कळीचे आहेत. रानटी हत्ती व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा मुद्दाही ऐरणीवर आहे.

Web Title: Maharashtra Assembly election 2024 mahayuti maha vikas Aghadi Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.