Maharashtra Budget 2021: विधानसभेत खळबळ! राज्याचा अर्थसंकल्प मांडण्य़ापूर्वी 36 कर्मचारी, नेते कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 09:56 AM2021-03-08T09:56:50+5:302021-03-08T09:57:37+5:30

Corona Virus in Maharashtra Budget session: राज्यातही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडू लागल्याने लॉकडाऊन पडणार की निर्बंध वाढणार याबाबत उलटसुटल चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे राज्यातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. 

Maharashtra Budget 2021: out of 2,746 samples from Assembly, 36 tested Corona positive | Maharashtra Budget 2021: विधानसभेत खळबळ! राज्याचा अर्थसंकल्प मांडण्य़ापूर्वी 36 कर्मचारी, नेते कोरोनाबाधित

Maharashtra Budget 2021: विधानसभेत खळबळ! राज्याचा अर्थसंकल्प मांडण्य़ापूर्वी 36 कर्मचारी, नेते कोरोनाबाधित

Next

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा (Corona positive) आकडा 11141 वर जाऊन पोहोचला असून विधानसभेमध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. विधानसभेत दोन दिवसांत 36 जण कोरोनाबाधित सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (2,746 samples received from Maharashtra Assembly on 6th & 7th March, 36 tested positive for COVID, ahead of Budget session: JJ Hospital, Mumbai)


महाराष्ट्र विधानसभेमधून 6 व 7 मार्चला 2,746 कर्मचारी नेत्यांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये 36 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. यामुळे आजच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातच आता मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली होती. 


काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार(Congress Vijay Wadettiwar) यांना कोरोना झाल्याची माहिती आहे, याबाबत वडेट्टीवारांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई येथे असून आज कोरोनाचे लक्षण दिसल्याने मी कोविडची चाचणी केली, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे, लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईल असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मागील २ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी, नागरिकांनी काळजी घ्यावी असंही त्यांनी सांगितले आहे.  




यानंतर विधानसभा आणि विधानपरिषदेतील 36 कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट आहे. राज्यातही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडू लागल्याने लॉकडाऊन पडणार की निर्बंध वाढणार याबाबत उलटसुटल चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे राज्यातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. 

Read in English

Web Title: Maharashtra Budget 2021: out of 2,746 samples from Assembly, 36 tested Corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.