Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 08:35 PM2024-10-23T20:35:25+5:302024-10-23T20:37:33+5:30

Maharashtra Assembly election 2024: भाजपने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Maharashtra Election 2024: BJP's Challenge to Cool Rebellion; What is the equation in Nashik? | Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

Nashik West Assembly Election 2024: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर करून भाजपाने बाजी मारली असली तरी बंडखोरी थोपविण्याचे कडवे आव्हान पक्षासमोर आहे. २००९, २०१४ व २०१९ या तीन विधानसभा निवडणुकीतील निकालावर प्रकाश टाकला असता, २०१९च्या निवडणुकीत विजयी उमेदवार भाजपाच्या सीमा हिरे यांना गत निवडणुकीच्या तुलनेने केवळ ९,७४६ मतांचे मताधिक्य मिळाले असून, २०१४ला मोदी लाटेत त्या २९ हजार ७०० मते अधिक घेऊन विजयी झाल्या होत्या.

यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरण खूप बदलले आहे. दोन पक्षांचे विभाजन होऊन ते भाजपासोबत महायुतीत आले आहेत. याशिवाय आघाडी अन् महायुतीकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. यातून बंडखोरीचे वादळ घोंघावत असल्याने दाखवत आहेत.

माजी नगरसेवक दिनकर पाटील यानी मंगळवारी (२२ ऑक्टोबर) कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट केली, तर धनंजय बेळे यांनीदेखील सीमा हिरे यांच्या उमेदवारीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटातील इच्छुकांची मनधरणी मात्र करावी लागेल. नाशिक मताधिक्य मिळविण्यासाठी उमेदवारांचा कस लागेल.

सर्वच बंडखोरांच्या भूमिकेमुळे मतांमध्ये घट होऊ न देण्याचे आव्हान असेल. पश्चिम मतदारसंघात खान्देश फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावेल. सिडको परिसरात खान्देशवासीयांचे मतदान निर्णायक ठरेल. 

कराड चौथ्यांदा प्रयत्नात 

कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी सलग तीन विधानसभा निवडणूक लढविल्या असून, कामगारांच्या मतांवर त्यांचे लक्ष असेल. त्यांना प्रत्येक निवडणुकीत १७ ते २० हजार मते मिळाली आहेत. ते आता सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. याशिवाय सातपूरचा भागही याच मतदारसंघात असल्याने कामगारांची वसाहत येथे मोठी आहे. त्यामुळे कामगारही निकालात निर्णायक ठरू शकतात. 

मनसेला २००९नंतर येथे यश मिळाले नाही. त्यामुळे मनसेची कसोटी लागेल. दिलीप दातीर, सलीम शेख, सुदाम कोंबडे हे मनसेकडून इच्छुक आहेत.

भाजपला बंडखोरीची चिंता

सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजपातील इच्छुक आपले मनसुबे बोलून दाखवत आहेत. माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी मंगळवारी (दि. २२) कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट केली, तर धनंजय बेळे यांनीदेखील सीमा हिरे यांच्या उमेदवारीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे उद्धव सेनेचे संभाव्य उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटातील इच्छुकांची मनधरणी मात्र करावी लागेल.

Web Title: Maharashtra Election 2024: BJP's Challenge to Cool Rebellion; What is the equation in Nashik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.