फोन टॅप होत असल्याचा संशय; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 08:23 AM2021-02-21T08:23:21+5:302021-02-21T08:25:56+5:30
Jitendra Awhad : आव्हाड यांनी मध्यरात्री केला आपला फोन टॅप होत असल्याचा दावा
महाविकास आघाडी सरकारमधील गृहमनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप गेला जात असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही काही नेत्यांनी फोन टॅप होत असल्याचा दावा केला होता. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होतोय असं वाटतं असल्याचं म्हटलं.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होत असल्याचा दावा केला. आव्हाड यांनी रात्री दीडच्या सुमारास एक ट्वीट करत हा दावा केला. "माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येत आहे. विशेषत: माझ्या व्हॉट्सअॅप कोणत्यातरी संस्थेकडून निगराणी ठेवली जात आहे," अशा आशयाचं ट्वीट आव्हाड यांनी केलं.
I strongly feel that my phone is being tapped specially #WhatsApp by some agency
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 20, 2021
यापूर्वी संजय राऊत यांनीदेखील फोन टॅपिंगविरोधात गंभीर आरोप केले बोते. तसंच त्यांनी एका मंत्र्याचं नाव घेत त्यांचा फोन टॅप होत असल्याचं म्हटलं होतं. राऊत यांच्या दाव्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसंच यानंतर भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंगच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आले होते. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीदेखील सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात लोकांच्या फोन टॅपिंगची फोन टॅपिंगची गरज नसल्याचं म्हणत टोला लगावला होता. सहकारी म्हणायचं आणि फोन टॅप करायचे असं मी करणार नाही, असंही ते म्हणाले होते.