Pratap Sarnaik: ...म्हणून शांत राहण्याचा निर्णय घेतला होता; 'बेपत्ता' प्रताप सरनाईकांनी लावली विधानसभेत हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 12:13 PM2021-07-05T12:13:16+5:302021-07-05T12:15:09+5:30
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गायब झाल्याचे बोलले जात होते. लोणावळ्यात ईडीने छापेदेखील टाकले होते. यावर आज सरनाईकांनी विधानसभेत हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: या देशामध्ये माझ्यावर कुठेही एफआयआर नाही, माझ्या विरोधात कोणी वक्तव्य दिलेले नाही. माझ्यावरील आरोपांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. त्यामुळे मी कुठे गायब झालेलो नाही, असे सांगतानाच शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावली. (Shiv sena leader Pratap Sarnaik came in monsoon session of Vidhansabha.)
या काळात प्रताप सरनाईक गायब झाल्याचे बोलले जात होते. लोणावळ्यात ईडीने छापेदेखील टाकले होते. यावर बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया, पत्नीचा कॅन्सर, कुटुंबावर कोरोनाचा घाला अशी संकटे आली होत. मी कुठेही गायब झालो नव्हतो. परिस्थिती पाहता मी काही दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. मी काही विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी नाही, ईडीने कारवाई केली म्हणून गायब होणार, बाहेर जाणार, पळून जाणार, असे ते म्हणाले.
युतीचे सरकार स्थापन होत होते तेव्हा मातोश्रीवर जी चर्चा झाली. त्यावेळी अडीज अडीज वर्षांचे मुख्यमंत्री पद द्या अशी जी घोषणा केली ती मी केली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत होते. तेव्हा मी आणि माझी मुले काँग्रेस, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आमदार कुठे ठेवावे, याची तयारी करत होतो. त्यांची विचारपूस करत होतो, असे त्यांनी सांगितले.
Vidhan Sabha Adhiveshan: जी काही चौकशी करायची ती करा; पत्रांवरून चंद्रकांत पाटलांचे सरकारला आव्हान
अर्णब गोस्वामीने अलिबागची केस दाबली होती, त्यावर आवाज उठविला. कंगना राणौतने जे मुंबई पोलिसांवर वक्तव्य केले. या काळात मी पक्षाच्या प्रवक्ते पणाचे काम केले होते. गोस्वामीची केस पुन्हा बाहेर यावी यासाठी आवाज उठविला. कंगनाविरोधात मी विधानसभेत प्रस्ताव मांडला, असे ते म्हणाले.