Vidhan Sabha Adhiveshan: स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची सभागृहात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 11:53 AM2021-07-05T11:53:28+5:302021-07-05T11:54:04+5:30

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: मुलाचा मृतदेह आई वडिलांच्या खांद्यावर खूप मोठे ओझे असते. एमपीएससीमध्ये पदे भरता येत नाहीत. तो मुलगा आईला सांगतो मी प्रिलिम पास केली, मेन पास केली, पण इंटरव्ह्यू झाला नाही आणि आत्महत्या करतो. किती गंभीर विषय आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: Give Rs 50 lakh to Swapnil Lonakar's family: Sudhir Mungantiwar | Vidhan Sabha Adhiveshan: स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची सभागृहात मागणी

Vidhan Sabha Adhiveshan: स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची सभागृहात मागणी

Next

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan:  राज्य सरकारला आजवर एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. यामुळे स्वप्निल लोणकरने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही म्हणून आत्महत्या केली. यासाठी राज्य सरकारने स्वप्निलच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या, अशी मागणी विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी केली. (Sudhir Mungantiwar)

Vidhan Sabha Adhiveshan: जी काही चौकशी करायची ती करा; पत्रांवरून चंद्रकांत पाटलांचे सरकारला आव्हान

मुलाचा मृतदेह आई वडिलांच्या खांद्यावर खूप मोठे ओझे असते. एमपीएससीमध्ये पदे भरता येत नाहीत. तो मुलगा आईला सांगतो मी प्रिलिम पास केली, मेन पास केली, पण इंटरव्ह्यू झाला नाही आणि आत्महत्या करतो. किती गंभीर विषय आहे. हे कठोर, दगडी मनाचे सरकार आहे. स्वप्निलच्या आईच्या मुलाखतीचा व्हिडीओ तुम्ही सभागृहात दाखवा, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

बच्चूभाऊ तुम्ही बोलू नका...
मुनगंटीवार यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवर विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावर ते बोलत होते. तेवढ्यात सत्ताधारी बाकावरून मंत्री बच्चू कडू यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुनगंटीवार यांनी बच्चूभाऊ तुम्ही बोलू नका, एवढा गंभीर विषय आहे, तुम्ही एवढे संवेदनशील आहात, कृपया तुम्ही बोलू नका, असे आवाहन केले. यानंतर कडू शांत झाले. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: Give Rs 50 lakh to Swapnil Lonakar's family: Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.