Vidhan Sabha Adhiveshan: सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 12:51 PM2021-07-05T12:51:22+5:302021-07-05T12:53:24+5:30

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: भास्कर जाधवांना(Bhaskar Jadhav) एकतर तालिकेवर घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मंत्री करावं. ते अतिशय अस्वस्थ आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Monsoon Session Live updates BJP Devendra Fadnavis Target Bhaskar Jadhav | Vidhan Sabha Adhiveshan: सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

Vidhan Sabha Adhiveshan: सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) आणि नाना पटोले(Nana Patole) यांच्या जुंपल्याचं दिसून आलं.घटनेनुसार सभागृहाचं कामकाज चालावं हे बोलणं म्हणजे सरकारच्या विरोधात नाही. आयुधं सरसकट गोठवण्याचा अधिकार सरकारला नाही. लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल?

मुंबई – विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळातील आयुधं गोठवण्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ झाला. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार विरुद्ध नाना पटोले, भास्कर जाधव आमनेसामने आल्याचं दिसून आले.

यावेळी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, तारांकित प्रश्न नाही आणि प्रश्नोत्तरे नाहीत, संसदीय आयुधं गोठवण्याचं काम देशात कुठल्याही विधानसभेने केले नाही. आयुधं सरसकट गोठवण्याचा अधिकार सरकारला नाही. लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल? आयुधं वापरण्याचा आमचा अधिकार पुन्हा मिळाला पाहिजे. आजच विधेयक मांडायचे आणि आजचं पास करायचे? पहिल्या दिवशीची कार्यक्रमपत्रिका रात्री १० वाजेपर्यंत मिळत नाही. विधिमंडळात विरोधकांची मुस्कटदाबी होणार असेल तर ते योग्य नाही असं ते म्हणाले.

तसेच भास्कर जाधवांना(Bhaskar Jadhav) एकतर तालिकेवर घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मंत्री करावं. ते अतिशय अस्वस्थ आहेत. सातत्याने खाली बसून सभागृहात बोलणं, हातवारे करणे हे सभागृहात चालत नाही. हे योग्य नाही. यांनी बोलून दिलं नाही तर आमचेही सदस्य बोलून देणार नाहीत असं सभागृह चालवायचं आहे का? असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

यावेळी सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) आणि नाना पटोले(Nana Patole) यांच्या जुंपल्याचं दिसून आलं. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,  विधानसभेचे कामकाज परंपरेनुसार आणि नियमांनुसार होतं. कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार वागत असेल तर याबाबत जे विधानसभेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करा. घटनेनुसार सभागृहाचं कामकाज चालावं हे बोलणं म्हणजे सरकारच्या विरोधात नाही. स्थगन प्रस्ताव तातडीच्या प्रश्नावर विचारला जातो तोही अधिकार आम्हाला नाही. जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही. ही राजेशाही आहे. विधानसभा अध्यक्ष हे आमचं संरक्षण आहे. कोरोनाबाबत चिंता असायला हवी. परंतु अधिवेशनापासून पळ का काढला जातो. आमदारांनी पत्र दिल्यानंतर त्याचे उत्तर देणं बंधनकारक आहेत. परंतु आम्हाला उत्तरं दिली जात नाही. आकडेवारी दिली जात नाही. आमदारांची इज्जत आहे की नाही. आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी आलो. आमदारांच्या पत्रांची नोंदवही ठेवली जात नाही. हक्कभंग टाकण्याचा अधिकारही काढून घेतला. कोरोनानंतर आमदारांचे सर्व अधिकार परत घेतले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी मुनगंटीवार बोलत असताना भास्कर जाधव सरकारच्या बाजूने त्यांना विरोध करत होते. तेव्हा अनिल देशमुख मधात बोलले आणि आत जात आहे. सरकारचे चमचेगिरी करण्याची काय गरज नाही. मी नियमांबाबत बोलत आहे असं मुनगंटीवार म्हणाले त्यावर नाना पटोलेंनी आक्षेप घेत सुधीर मुनगंटीवार आम्हाला धमकी देतायेत, सभागृहात धमकी दिली जाते. हे बरोबर नाही असं सांगितले. तर मंत्री नवाब मलिक यांनी सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर सरकारच्या बाजूने त्याला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही सरकारचे चमचेगिरी करण्यासाठी आहात हे बोलणं योग्य नाही असं म्हटलं.

या संपूर्ण प्रकारावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, पॉईंट ऑफ प्रोसिजरवर बोलत असताना मला जेलमध्ये टाकण्याची धमकी सुधीर मुनगंटीवारांनी दिली. भाजपाविरोधात जो कुणी बोलेल त्याला जेल, सीबीआय, ईडी हेच महाराष्ट्रात चाललंय. तुम्ही १०० कोटी बोलता ते तुमच्या दृष्टीने कमीच आहे. दिल्लीचं भाजपा कार्यालय कशाच्या जोरावर बांधलं? बीएसईमधील कामकाजाचा उल्लेख सभागृहात करायचा नसतो याची समज विरोधकांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली.  

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Monsoon Session Live updates BJP Devendra Fadnavis Target Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.