Maharashtra Vidhan Sabha: शिवसेना आमदार भास्कर जाधव संतापले; विरोधकांवर गंभीर आरोप लावले

By प्रविण मरगळे | Published: March 9, 2021 03:16 PM2021-03-09T15:16:33+5:302021-03-09T15:20:34+5:30

Maharashtra Budget Session: Bhaskar Jadhav Target Devendra Fadnavis over Mansukh Hiren Death Controversy: इतकचं नाही तर आमचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय आमचं कोणी काही करू शकत नाही. राज्यानं ज्यांचे संरक्षण काढलं अशा गुंडांना केंद्राने संरक्षण दिलं.

Maharashtra Vidhan Sabha: Shiv Sena MLA Bhaskar Jadhav angry on Sachin Vaze, Mansukh hiren case | Maharashtra Vidhan Sabha: शिवसेना आमदार भास्कर जाधव संतापले; विरोधकांवर गंभीर आरोप लावले

Maharashtra Vidhan Sabha: शिवसेना आमदार भास्कर जाधव संतापले; विरोधकांवर गंभीर आरोप लावले

googlenewsNext
ठळक मुद्देसचिन वाझे तपास अधिकारी राहिला तर विरोधकांचे बिंग फुटेल याची भीती देवेंद्र फडणवीसांना आहे सभागृहात इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर गदारोळ होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत...?गृहमंत्र्यांना खुलं आव्हान आहे, कर नाही त्याला डर कशाला....माझी चौकशी करावी

मुंबई – मुकेश अंबानी(Mukesh Ambani) प्रकरणातील स्कोर्पिओ गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. मनसुख हिरेन(Mansukh Hiren) प्रकरणावरून विरोधकांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर थेट खूनाचे आरोप केले. यावरून सभागृहात गोंधळ माजला, सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गोंधळामध्ये विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव(Shivsena Bhaskar Jadhav) यांनी विरोधकांवर आक्रमक निशाणा साधला, जाधव म्हणाले की, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी हे प्रकरण दाबून टाकले, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अन्वय नाईक(Anavay Naik Suicide Case) यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूची चौकशी करावी असं पत्र दिलं, देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबलं असंही म्हटलं, या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करून त्यांना काढून टाकण्याची मागणी केली जातेय, पण सरकार सचिन वाझेंना काढणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.

इतकचं नाही तर आमचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय आमचं कोणी काही करू शकत नाही. राज्यानं ज्यांचे संरक्षण काढलं अशा गुंडांना केंद्राने संरक्षण दिलं. जस्टिस लोया यांची नागपूरात हत्या कशी झाली? हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. सचिन वाझे(Sachin Vaze) तपास अधिकारी राहिला तर विरोधकांचे बिंग फुटेल याची भीती देवेंद्र फडणवीसांना आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला यावर देवेंद्र फडणवीसांनीही चोख उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सभागृहात इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर गदारोळ होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत...? पोलीस लोकांची हत्या करतायेत. सचिन वाझे यांना कोणाच्या दबावाखाली वाचवण्याचं काम सुरू आहे. अन्वय नाईक प्रकरणात हायकोर्टाने काय म्हटलंय हे भास्कर जाधव यांना माहिती नाही. गृहमंत्र्यांना खुलं आव्हान आहे, कर नाही त्याला डर कशाला....माझी चौकशी करावी....धमक्या देऊन सचिन वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायेत का? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला विचारला.

काय म्हणाले गृहमंत्री?

अन्वय नाईक यांची आत्महत्या झाली, त्यांच्याबद्दल त्यांच्या मुलगी आणि पत्नीने तक्रार केली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही केस दाबली त्याची चौकशी करायची आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) म्हणाले होते.

तर सचिन वाझे, अन्वय नाईक, मनसुख हिरेन या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ सुरू असताना काँग्रेस आमदार नाना पटोले(Congress Nana Patole) म्हणाले की,कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे, अशात सोशल डिस्टेसिंगचं पालन करणं महत्त्वाचं आहे, तरीही विरोधकांनी नियमांची पायमल्ली करून सभागृहात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवला आहे, प्रेक्षक गॅलरीतील आमदारही सभागृहात आले आहेत, कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha: Shiv Sena MLA Bhaskar Jadhav angry on Sachin Vaze, Mansukh hiren case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.