Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:08 PM2024-10-23T18:08:50+5:302024-10-23T18:09:52+5:30
Maharashtra Assembly election 2024: महायुतीतील तिन्ही पक्षांनी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यात कल्याण पूर्व मतदारसंघ भाजपाकडे गेला आहे. अपेक्षेप्रमाणे गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुरलीधर भवार, कल्याण
kalyan east vidhan sabha 2024 Update: भाजपाने पक्षाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्या २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र कल्याण पूर्वेतील महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद काही संपुष्टात आलेला नाही. शिंदे गटातून इच्छुक असलेले विशाल पावशे हे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पावशे यांनी स्पष्ट केले आहे.
अपक्ष लढणार की...
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून विशाल पावशे निवडणूकीचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून दाखल करतात की, अन्य कोणत्या दुसऱ्या पक्षात उडी मारुन उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतात. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी अर्ज ते जेव्हा दाखळ करतील तेव्हा ते कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हे त्याच वेळी स्पष्ट होणार आहे. पावशे यांच्या निर्धारामुळे महायुतीत अस्वस्थता वाढली आहे.
निवडणूकीच्या आजार संहिता जाहिर होण्यापूर्वीच पावशे यांनी निवडणूकीची तयारी केली होती. त्यांनी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आमदार गायकवाड यांच्या विरोधात बॅनरबाजी केली होती.
महेश गायकवाडही इच्छुक
या मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे महेश गायकवाड हे देखील इच्छुक आहेत. त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. त्यात त्यांनी वेळ आली आहे. जनसामान्यांची ताकद दुनियेपर्यंत पोहचविण्याची. वेळ आली आहे. आपला उमेदवार आपणच निवडायची.
दुसरीकडे शिंदे सेनेचे विधानसभा प्रमुख निलेश शिंदे हे देखील कल्याण पूर्वेतून इच्छूक होते. मात्र महायुतीतील भाजपने आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने निलेश शिंदे हे प्रचंड नाराज आहे. या तिन्ही इच्छूकांची नाराजी दूर करण्यात शिंदे सेनेला यश येते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.