भाजपला मोठा धक्का! विदर्भातील विद्यमान १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:01 PM2021-06-21T20:01:03+5:302021-06-21T20:04:06+5:30

विदर्भातील भाजपच्या विद्यमान १० नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधल्याची माहिती मिळाली आहे.

major setback to bjp after exiting 10 bjp corporator from vidarbha joins shiv sena | भाजपला मोठा धक्का! विदर्भातील विद्यमान १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला मोठा धक्का! विदर्भातील विद्यमान १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Next

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची दिल्लीत झालेली भेट, त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली असून, त्यात आता भर पडण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील भाजपच्या विद्यमान १० नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधल्याची माहिती मिळाली आहे. (major setback to bjp after exiting 10 bjp corporator from vidarbha joins shiv sena)

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. एकाचवेळी १० विद्यमान नगरसेवक आणि २ माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा घेतलेला निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हे सर्व नगरसेवक हिंगणघाट नगरपरिषदेमध्ये नगरसेवक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर येऊन त्यांनी शिवबंधन बांधले आहे.

“सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा”: नवाब मलिक

स्थानिक आमदाराच्या कामाला कंटाळून निर्णय

भाजपचे स्थानिक आमदार समीर कुणावर यांच्या कामाला कंटाळून शिवसेना प्रवेश करत असल्याचे बोलले जात आहे. विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह १० विद्यमान भाजपा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला. दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा भाजपसोबत जुळवून घेण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. 

“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार

उद्धव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन

कोविडमुळे असलेली संचारबंदी उठताच हिंगणघाट नगरपरिषदचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे  यांच्यासह सतीष धोबे, सुरेश मुंजेवार, मनीष देवढे, मनोज वरघणे, भास्कर ठवरे, निलेश पोगले, निता धोबे, संगीता वाघमारे, सुनिता पचोरी, प्रतिभा पडोळे, देवेंद्र पडोळे, डॉ.महेंद्र गुढे यांचा प्रवेश घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पक्षसचिव तथा राज्यसभा सदस्य खासदार अनिल देसाई,  जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, शिवसेना विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हाप्रमुख अनिल देवतारे व प्रशांत शहागडकर तसेच हिंगणघाट येथील युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुनोत यांची उपस्थिती होती.
 

Web Title: major setback to bjp after exiting 10 bjp corporator from vidarbha joins shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.