मालेगावी दादा जिंकले, दादा हरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:42 PM2019-10-25T22:42:10+5:302019-10-25T22:47:34+5:30
राज्यमंत्री दादा भुसे व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मविप्रचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांच्यात काट्याची लढत झाली. ‘दादा’ विरुद्ध ‘दादा’ यांच्यात झालेल्या लढतीत अखेर एका दादाला पराभवाला सामोरे जावे लागले.
मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार तथा ग्रा
कॉँग्रेस - राष्टÑवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांचे निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसात चुकलेले नियोजन व गावोगावच्या कार्यकर्त्यांना वेळेवर ‘रसद’ न पोहोचल्याने भुसे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. सलग तीन टर्म बाह्य मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करून यंदाही विजयाचा चौकार मारून भुसेंनी मुरब्बी राजकारणी असल्याचे विरोधकांना दाखवून दिले आहे.
नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर तालुक्यात प्रचाराचा धुराळा उडाला होता. भुसेंचा विजयाचा वारू रोखण्यासाठी विरोधक एकवटले होते.
भुसे यांनी तालुक्यात केलेली विकासकामे, औद्योगिक वसाहत, अतिक्रमण नियमनाकुल, रस्ते, स्वतंत्र महिला व बालरुग्णालय, उद्यान आदी कामांच्या बळावर तसेच जिल्हा व रोजगार निर्मितीचे प्रश्न मतदारांपुढे घेऊन जाऊन प्रचार केला. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भुसेंचे वर्चस्व आहे. भाजपचे गटनेते सुनील गायकवाड यांनी शहरातील डॅमेज कंट्रोल रोखीत भुसेंना मोठे मताधिक्य मिळवून दिले, तर डॉ. तुषार शेवाळे यांनी तालुक्याचा रखडलेला विकासाचा मुद्दा मतदारांपुढे नेला होता. शेवटच्या दोन दिवसात शेवाळे यांची प्रचार यंत्रणा कोलमडून पडली. डॉ. शेवाळे यांच्याकडे प्रचार यंत्रणा हाताळणारी यंत्रणा स्थानिक राजकारण्यांना ओळखत नव्हती परिणामी गावोगावच्या कार्यकर्त्यांना रसद पुरवली गेली नाही. हीच संधी ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांच्या समर्थकांनी साधत शेवटचे दोन दिवस झोकून देत प्रचार करत विजयश्री खेचून आणली.