ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले मालदा आंबे, दहा वर्षांपासूनची परंपरा राखली कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 02:27 PM2021-07-01T14:27:08+5:302021-07-01T14:29:14+5:30

Mamata Banerjee & Narendra Modi News: ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जींमधील वाद कायम राहिला आहे.

Mamata Banerjee sent Malda Mango to Prime Minister Narendra Modi | ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले मालदा आंबे, दहा वर्षांपासूनची परंपरा राखली कायम

ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले मालदा आंबे, दहा वर्षांपासूनची परंपरा राखली कायम

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांमध्ये गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग या जातीचे आंबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठवले मोदींबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही भेट म्हणून आंबे पाठवले आहेत

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. नुकत्याच आटोपलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका दिसून आली होती. (Mamata Banerjee & Narendra Modi News) ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जींमधील वाद कायम राहिला आहे. मात्र असे असले तरी दोन्ही नेत्यांमधील वैयक्तिक संबंधांमध्ये माधुर्य कायम आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांमध्ये गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे. (Mamata Banerjee sent Malda Mango to Prime Minister Narendra Modi)

ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग या जातीचे आंबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठवले आहेत. मोदींबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही भेट म्हणून आंबे पाठवले आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंब्याच्या पेट्या भेट म्हणून पाठवल्या आहेत.

बंगालमधील राजकीय हिंसाचार, नारदा घोटाळ्यातील उघड होत असलेली प्रकरणे, मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांचे अचानक करण्यात आलेले स्थानांतरण आणि राज्यपाल जगदीप घनखड अशा एक ना अनेक विषयांवरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये सातत्याने तणाव आहे.

दरम्यान, केंद्र सरकारसोबत तणाव असला तरी ममता बॅनर्जी यांनी आंबे पाठवण्याची परंपरा कायम राखली आहे. ममता बॅनर्जी २०११ पासून भेट म्हणून आंबे पाठवत आहेत. २०११ मध्येच त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती.  

Web Title: Mamata Banerjee sent Malda Mango to Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.