ममतांचे टेंन्शन अजून वाढले, आणखी एका निकटवर्तीयाने नव्या पक्षाची घोषणा करत विरोधात रणशिंग फुंकले

By बाळकृष्ण परब | Published: January 21, 2021 09:08 PM2021-01-21T21:08:27+5:302021-01-21T21:13:21+5:30

west bengal assembly election 2021: सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांनी एकापाठोपाठ एक अशी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ममतांच्या अजून एका निकटवर्तीयांने नव्या पक्षाची घोषणा करत ममतांविरोधात रणशिंग फुंकले आहे.

Mamata Banerjee's tension escalates, another close aide announces new party | ममतांचे टेंन्शन अजून वाढले, आणखी एका निकटवर्तीयाने नव्या पक्षाची घोषणा करत विरोधात रणशिंग फुंकले

ममतांचे टेंन्शन अजून वाढले, आणखी एका निकटवर्तीयाने नव्या पक्षाची घोषणा करत विरोधात रणशिंग फुंकले

Next
ठळक मुद्देबंगालमधील मुस्लिम समुदायावर बऱ्यापैकी प्रभाव असलेले फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आज आपल्या नव्या पक्षाची केली घोषणा सिद्दीकी यांनी आपल्या पक्षाचे नाव इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) असे ठेवले आहेपीरजादा अब्बास सिद्दीकी हे दीर्घकाळापासून ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय राहिले होते

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची चिंता अधिकाधिक वाढत आहे. आधी सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांनी एकापाठोपाठ एक अशी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ममतांच्या अजून एका निकटवर्तीयांने नव्या पक्षाची घोषणा करत ममतांविरोधात रणशिंग फुंकले आहे.

ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय आणि बंगालमधील मुस्लिम समुदायावर बऱ्यापैकी प्रभाव असलेले फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. सिद्दीकी यांनी आपल्या पक्षाचे नाव इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) असे ठेवले आहे. पीरजादा अब्बास सिद्दीकी हे दीर्घकाळापासून ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय राहिले होते. मात्र गेल्या काही काळापासून ते ममतांवर नाराज होते. तसेच उघडपणे तृणमूल काँग्रेसला विरोध करत होते.

पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी हल्लीच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर ओवेसी यांनी अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष निवडणूक लढवेल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर अब्बास सिद्दीकी यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची तयारी सुरू केली आणि आज नव्या पक्षाची घोषणा केली.

नव्या पक्षाची घोषणा करताना सिद्दीकी म्हणाले की, आमचा पक्ष हा भारतातील पहिला खरा धर्मनिरपेक्ष पक्ष असेल. तो वंचित वर्गातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करेल. स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्षतेचा दावा करणारे अनेक पक्ष अस्तित्वात आले. मात्र एका वर्गाचा अपवाद वगळता अन्य लोक वंचित राहिले. मुस्लिम आणि मागासवर्गीय मागे पडले आहेत. आमचा उद्देश वंचित वर्गातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे, असे त्यांनी सांगितले.

अब्बास सिद्दीकी यांनी या नव्या पक्षाचे अध्यक्षपद त्यांचे भाऊ नौशाद सिद्दीकी यांच्याकडे सोपवले आहे. अब्बास सिद्दीकींच्या या पक्षामुळे ममता आणि तृणमूल काँग्रेसच्या मुस्लिम व्होटबँकेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत.

Web Title: Mamata Banerjee's tension escalates, another close aide announces new party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.