"भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक; निवडणुकीआधी खोटी आश्वासनं देतील अन् संपली की पळून जातील"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 09:36 AM2021-01-20T09:36:02+5:302021-01-20T09:38:54+5:30
Mamata Banerjee And BJP : तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. यावरून ममता बॅनर्जी यांनी रॅलीत भाजपावर हल्लाबोल केला.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आगामी निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. मात्र, आता त्यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना आता ममतांनी खडेबोल सुनावले आहेत.
ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे. "भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सापासोबत भाजपाची तुलना केला आहे. ज्यांची भाजपात जाण्याची इच्छा आहे ते जाऊ शकतात असं म्हमत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्यांना सुनावलं आहे. मंगळवारी पुरुलिया येथे एका रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी ठणकावलं आहे. तसेच विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपा आयटीचा वापर करत आहे. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ते व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करत असल्याचं म्हटलं आहे.
"राजकारण ही आदर्श विचारसरणी आहे; आपण रोज कपडे बदलू शकतो, विचारसरणी नाही"
"ज्यांना भाजपात जायचं आहे ते जाऊ शकतात, पण आम्ही त्यांच्यासमोर आपली मान झुकवणार नाही. राजकारण ही एक आदर्श विचारसरणी आहे, तत्वज्ञान आहे. आपण रोज कपडे बदलू शकतो, विचारसरणी नाही. तुम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान केलंत. पण तुमचे खासदार भेटण्यासाठी आले का? त्यांनी तुम्हाला काही दिलं का? ते निवडणुकीच्या आधी तुम्हाला खोटी आश्वासनं देतील आणि निवडणूक संपली की पळून जातील" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. यावरूनही ममता बॅनर्जी यांनी रॅलीत भाजपावर हल्लाबोल केला.
"विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपा आयटीचा वापर करतं तर खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ते व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापरतात"
"विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपा आयटीचा वापर करत आहे. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ते व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करत आहेत. भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहे" असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी आतापासून राजकीय धुमाकूळ सुरू आहे. सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये निवडणूक रॅली घेतली. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
गावात बॅनर लावून शेतकऱ्यांनी केला बीजेपी आणि जेजेपी नेत्यांचा विरोध, म्हणाले...https://t.co/AoIHElowmK#FarmersProstests#Farmers#BJP#JJP
— Lokmat (@MiLOKMAT) January 18, 2021
ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवणार, रॅलीत घोषणा
मला नंदीग्राममधून निवडणूक लढवायची आहे, असे यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी हे आवाहन स्टेट युनिटच्या अध्यक्षांना स्टेजवरच केले आणि तेथे तातडीने याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच, यंदाही राज्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. तृणमूल काँग्रेसला 200 हून अधिक जागा मिळतील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. याचबरोबर, रॅलीत ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले शुभेंदु अधिकारी यांच्यावर निशाणा साधला. नंदीग्राममध्ये आंदोलन कोणी केले, यावर कोणालाही माहिती घेण्याची गरज नाही. आज शेतकरी आंदोलन करीत आहेत आणि भाजपाने तातडीने हे तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
साक्षी महाराजांचा असदुद्दीन ओवैसींवर जोरदार हल्लोबोल; वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्चेत, म्हणाले...https://t.co/uFMS8GKSC9#SakshiMaharaj#AsaduddinOwaisi#BJP#AIMIMpic.twitter.com/6Hvp0fRdD9
— Lokmat (@MiLOKMAT) January 19, 2021