Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 02:48 PM2021-03-11T14:48:46+5:302021-03-11T14:51:33+5:30

BJP Criticized CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze in Mansukh Hiren Death Case: वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे.

Mansukh Hiren Death: BJP Target CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze | Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...”

Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...”

Next
ठळक मुद्देतोपर्यंत मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालणाऱ्या ठाकरे सरकारला भाजपाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच धडा शिकवलावाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याचीच जनतेला प्रतिक्षा आहे

मुंबई – मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या आकस्मित मृत्यूमुळे हे प्रकरण संशयास्पद झालं आहे, यातच या प्रकरणाची तपास करणारे अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधातच हिरेन यांच्या कुटुंबाने खळबळजनक आरोप केल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर आरोप केले. (BJP Target CM Uddhav Thackeray over allegations on Sachin Vaze in Mansukh Hiren Death)

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) या प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना खडेबोल सुनावले होते, सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला होता. त्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भाजपाने(BJP) ट्विट करत म्हटलंय की, सचिन वाझेंवरील आरोपांची चौकशी सुरू आहे, पण मुख्यमंत्रीच त्यांची वकिली करताहेत, मुख्यमंत्री महोदय, चौकशी पूर्ण होऊ द्या, मग खुशाल बाजू घ्या. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी? वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालणाऱ्या ठाकरे सरकारला भाजपाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच धडा शिकवला, अकार्यक्षमतेचा कळस गाठणाऱ्या सरकारला भाजपाने हिरेन प्रकरणासह अनेक मुद्द्यांची दखल घ्यायला भाग पाडलं, हिरेन हत्या प्रकरणात बरीच मोठी नावे बाहेर येतील, वाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याचीच जनतेला प्रतिक्षा आहे असा टोलाही भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

हत्या, आत्महत्या मृत्यू झाल्यानंतर गांभीर्याने दखल घेणे हे काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेली आहे. सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावे आहेत. तपास सुरू झालेला आहे. आधी फाशी मग तपास ही पद्धत नाही होऊ शकत, ही सरकारची पद्धत नाही. त्यांनीही सरकार चालवलेलं आहे. टार्गेट करायचं, धिंडवडे काढायचे मग तपासात आले की तो नाहीच तर मग कोणीही असला तरी कारवाई करणार.  विरोधकांनी नि:पक्षपातीपणाला चष्मा लावावा. कॉल रेकॉर्ड, सीडीआरवरुन लगेच कुणाला फाशी देण्याची भूमिका घ्यायची का? असे असेल तर मग पोलीस पाहिजेतच कशाला? त्यांनीच तपास करावा असे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना सुनावले. हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण आम्ही गांभीर्यानेच घेतले आहे. पण उगाच कुणाला टार्गेट करायचं, अब्रूचे धिंडवडे काढायचे अन् मग तपासात निर्दोष आढळल्यावर काय करणार असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

Web Title: Mansukh Hiren Death: BJP Target CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.