"मनसूख हिरेन यांचा खून झाला असावा, तो सचिन वाझेंनी केला असावा", सभागृहात गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 12:53 PM2021-03-09T12:53:51+5:302021-03-09T12:57:20+5:30

Mansukh Hiren Death Case : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

"Mansukh Hiren must have been killed, it must have been Sachin Waze", Devendra Fadnavis made serious allegations in the House on the basis of a complaint lodged by Hiren's wife | "मनसूख हिरेन यांचा खून झाला असावा, तो सचिन वाझेंनी केला असावा", सभागृहात गंभीर आरोप

"मनसूख हिरेन यांचा खून झाला असावा, तो सचिन वाझेंनी केला असावा", सभागृहात गंभीर आरोप

googlenewsNext

मुंबई - व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणावरून (Mansukh Hiren Death Case) आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रार अर्जाचा हवाला देत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा, तसेच तो सचिन वाझे यांनी केला असावा. हिरेन यांना सचिन वाझे आधीपासून ओळखत होते. तसेच हिरेन यांची कार चार महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती, असा दावा देवेंद्र फडणवसी यांनी केला.   ("Mansukh Hiren must have been killed, it must have been Sachin Waze", Devendra Fadnavis made serious allegations in the House on the basis of a complaint lodged by Hiren's wife)

सभागृहामध्ये आज मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा तक्रार अर्ज वाचून दाखवत फडणवीस म्हणाले की, मनसुख हिरेन यांनी अंबानीच्या घरासमोर सापडलेल्या कार प्रकरणात त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. ३ मार्च रोजी माझे पती रोजच्या प्रमाणे दुकानात गेले होते. त्यानंतर रात्री फोन आला. त्यात त्यांनी सांगितले की, सचिन वाझे या प्रकरणात मला अटक व्हायला सांगताहेत. तसेच दोन दिवसांत सोडतो असे म्हणताहेत, असे सांगितले. मात्र मी या प्रकरणात तुम्ही अटक होण्याची गरज नसल्याचे सांगितले. 

वरील एकंदरीत परिस्थितीवरून माझे पती मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा आणि त खून सचिन वाझेंनी केला असावा, अशी मला शंका आहे, अशी गंभीर शंका हिरेन यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीतून केली आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. दुसरी बाब म्हणजे मनसुख हिरेन यांची कार गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती. त्यांनी फेब्रुवारीत ती परत केली होती. दरम्यान, एवढे पुरावे असताना सचिन वाझेंना अटक का करण्यात आली नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक झाल्यानंतर दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. 

Read in English

Web Title: "Mansukh Hiren must have been killed, it must have been Sachin Waze", Devendra Fadnavis made serious allegations in the House on the basis of a complaint lodged by Hiren's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.