व्हिडीओ क्लीप, कागदपत्रे उघड केली तर अनेकांना हादरा बसेल; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 01:05 PM2020-09-12T13:05:18+5:302020-09-12T13:58:06+5:30

विनोद तावडे, पंकजा मुंडे, यासारख्या अनेक नेत्यांवर अनेक आरोप झाले. पण कोणाचेही राजीनामे घेतले नाहीत, माझ्यावर आरोप झाला आणि राजीनामाही घेतला हे मनाला वेदनादारक होतं, मला राजीनामा देण्याबाबत सांगितलं होतं असं एकनाथ खडसे म्हणाले.

Many would be shocked if the video clip, documents were revealed; BJP Eknath Khadse | व्हिडीओ क्लीप, कागदपत्रे उघड केली तर अनेकांना हादरा बसेल; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

व्हिडीओ क्लीप, कागदपत्रे उघड केली तर अनेकांना हादरा बसेल; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Next
ठळक मुद्देमाझ्याकडे अनेक व्हिडीओ, कागदपत्रे आहेत ती समोर आली तर धक्का बसेलवरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेनमाझ्यावर जे आरोप केले ते विरोधकांनीही केले नाहीत, माझा राजीनामा विरोधकांनाही मागितला नाही

मुंबई – १९९५ पासून आमच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जात होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता एकच निवडणूक लढवली आहे. त्यामुळे कोणती यादी पाठवली जाते, कोणती डावलली जाते हे आम्हाला पक्क माहिती आहे अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसेंनीभाजपाच्या राज्य नेतृत्वावर टीकास्त्र सोडलं. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचं कामकाज सुरु असताना मला अँन्टी चेंबरमध्ये बोलावलं, तिथे मी गेलो, आम्ही दोघचं होतं, त्यावेळी राज्यपालपदासाठी मी तुमचं नाव पाठवतोय असं चेंबरमध्ये बोलणं झालं. माझ्या एकलुत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो असंही फडणवीस म्हणाले, त्यांनी प्रयत्न केले असतील पण झालं नाही. राज्यसभेच्या वेळीही माझं नाव सुचवणार असं सांगितले पण त्यानंतरही नाव वरिष्ठांना नाकारलं असं सांगितले. विधान परिषदेसाठीही नाव पाठवलं, जी नावे दिली ती वगळून दुसरी ४ नावं आली. त्यावेळी मी म्हटलं जमत असेल तर करा, उगाच खोट्या अपेक्षा दाखवू नका, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पाठवलेल्या यादीला संमती देत नाही म्हणजे कुठेतरी गडबड वाटते, कारण आमच्यावेळी वेगळं होतं, जी नावे आम्ही दिल्लीला पाठवत होतो त्यांना संमती मिळत होती असं ते म्हणाले.

त्याचसोबत माझ्याकडे अनेक व्हिडीओ, कागदपत्रे आहेत ती समोर आली तर धक्का बसेल, मी इतक्या खालची पातळीचं राजकारण करत नाही, वरिष्ठांना ते दाखवलं आहे. त्यांच्यासारखं मी चुका केल्या नाहीत, या व्यक्तिगत बाबी आहेत, मी पक्षाच्या वरिष्ठांसमोर हे मांडले आहे. वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन.काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही. जे काही होईल जनतेसमोर येईल असा इशाराही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, ४० वर्षाच्या राजकीय जीवनात एकही आक्षेप माझ्यावर आला नाही, माझ्यावर जे आरोप केले ते विरोधकांनीही केले नाहीत, माझा राजीनामा विरोधकांनाही मागितला नाही. पक्षातंर्गत ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर नैतिक पदावरुन राजीनामा दिला. नंतर सरकारच्या काळात खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एक्सिस बँकेबाबत आरोप झाला. पदाचा दुरुपयोग झाला असं म्हटलं मग मला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा त्या वेदना आणि खंत माझ्या मनात नेहमी राहणार आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, यासारख्या अनेक नेत्यांवर अनेक आरोप झाले. पण कोणाचेही राजीनामे घेतले नाहीत, माझ्यावर आरोप झाला आणि राजीनामाही घेतला हे मनाला वेदनादायी होतं, मला राजीनामा देण्याबाबत सांगितलं होतं असं एकनाथ खडसे म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

पेशवेकालीन इतिहास पाहिला तर त्यात बारभाई मंडळ होतं त्यांनी जे कारस्थान जे होतं त्यावरुन ते प्रसिद्ध झालं. धा चा मा केल्याने काही गडबड झाली ती पाहिलेली आहे. नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान म्हणून पुस्तकाचं नाव आहे. सध्या पुरावे, कागदपत्रे गोळा करत आहे. २००९ ते २०१४ आणि २०१४ ते मी राजीनामा देईपर्यंत जे काही घडलं, ते पुराव्यानिशी मांडणार आहे. लिहायला उशीर झाला तरी चालेल पण जे मांडेन ते वस्तूनिष्ठ असेल. लवकरच त्याचा लेखक ठरवेन

कोणी मुख्यमंत्री होवो अन्यथा पंतप्रधान होवो, भाजपात संधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. देवेंद्र फडणवीस वरिष्ठांच्या जवळ आहे. महाराष्ट्रात सरकार आलं असतं पण मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे ही भूमिका घेतल्याने १०५ जागा मिळूनही टाळ वाजवत बसावं लागलं नसतं. दोन्ही पक्ष मिळून संख्याबळ होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी काय बिघडलं असतं. युती म्हणून निवडणूक लढवली तडजोड थोडी केली असती तर ही वेळ आली नसती. मी पुन्हा येईन हे फक्त देवेंद्र फडणवीस म्हणत होते, बाकी कोण म्हणत नव्हते. भाजपाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, सभागृहात विरोधी पक्षनेते बोलतात पण बाहेर बोलणारे राहिले कुठे? सामुहिकपणे हल्लाबोल करुन राज्य सरकारला धारेवर धरता येते असंही एकनाथ खडसे म्हणाले.

Web Title: Many would be shocked if the video clip, documents were revealed; BJP Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.