“छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 12:00 PM2021-07-03T12:00:24+5:302021-07-03T12:01:46+5:30

या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही?

Maratha Reservation: Chhatrapati Sambhaji Raje, we will make you the CM, Sambhaji Briged Offer | “छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर

“छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आमच्या पक्षात यावं नेतृत्व करावं ओबीसीतून आरक्षण द्या, अशी भूमिका घेणार नाही. जे जे वंचित आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे

बीड – मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने मराठा समाजाला धक्का बसला. मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत. यासाठी सध्या छत्रपती संभाजी महाराज सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.  

या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? त्यावर संभाजीराजे म्हणाले, प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा. संभाजीराजेंना २००८-०९ सोबत घेऊन आम्ही यात्रा काढली होती. आम्ही त्यांना आपलं समजतो. संभाजीराजेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना बाहेर पडावं लागेल. पक्ष काढावा लागेल. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आमच्या पक्षात यावं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

तसेच छत्रपती संभाजीराजे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केला.

छत्रपती घराण्याचा वारस आहे, मॅनेज होणार नाही

कोल्हापूर येथील मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच मी सरकारशी संवाद साधला. याचा अर्थ मी मॅनेज झालो, असे काढणे चुकीचे आहे. छत्रपती घराण्याचा वारस असल्याने मी मॅनेज होणार नाही, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी केले होते.

ओबीसीतून आरक्षण द्या, असे म्हणणार नाही

संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी समानतेचा विचार मांडला. त्यांचा वारसदार म्हणून मी ओबीसीचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी भूमिका घेणार नाही. जे जे वंचित आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी माझी भूमिका कायम राहणार आहे. ते कसे द्यायचे ते सत्ताधाऱ्यांनी ठरवायचे आहे असंही संभाजीराजे म्हणाले होते.

Web Title: Maratha Reservation: Chhatrapati Sambhaji Raje, we will make you the CM, Sambhaji Briged Offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.