Maratha Reservation: भाजपमधील मराठा नेते करणार राज्यभर दौरे, विनायक मेटे यांची मराठा आरक्षणासाठी मोर्चाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:57 AM2021-05-27T08:57:00+5:302021-05-27T08:58:32+5:30

Maratha Reservation: महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात कमी पडल्याची बाब जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपमधील मराठा समाजाचे दौरे राज्याच्या विविध जिल्ह्यांत जाणार आहेत.

Maratha Reservation: Maratha leaders from BJP will tour the state, Vinayak Mete will prepare for the Maratha reservation | Maratha Reservation: भाजपमधील मराठा नेते करणार राज्यभर दौरे, विनायक मेटे यांची मराठा आरक्षणासाठी मोर्चाची तयारी

Maratha Reservation: भाजपमधील मराठा नेते करणार राज्यभर दौरे, विनायक मेटे यांची मराठा आरक्षणासाठी मोर्चाची तयारी

Next

मुंबई - महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात कमी पडल्याची बाब जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपमधील मराठा समाजाचे दौरे राज्याच्या विविध जिल्ह्यांत जाणार आहेत. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे हे या आधीच राज्याचा दौरा करीत आहेत. भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा काढण्याची तयारी चालविली आहे.

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच नरेंद्र पाटील हे नेते जिल्हावार दौरे करणार आहेत. पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, बीड, पुणे, ठाणे, सातारा, औरंगाबाद, जालना, अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये हे नेते स्वतंत्रपणे जातील.

दुसरीकडे भाजपमधील काही मागासवर्गीय नेत्यांना पदोन्नतीतील आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने कसे टिकवले होते आणि महाविकास आघाडी सरकारने ते कसे रद्द केले, हे समाजात जावून सांगण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीत सर्व मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. ओबीसींसाठीच्या समितीतील सर्व मंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत; मात्र मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीत बिगर मागासवर्गीय मंत्र्यांचा भरणा आहे, याकडे भाजपचे मागासवर्गीय नेते लक्ष वेधणार आहेत. 

जबाबदारीचे वाटप
भाजपमधील काही मागासवर्गीय नेत्यांना पदोन्नतीतील आरक्षण फडणवीस सरकारने कसे टिकवले होते आणि आघाडी सरकारने ते कसे रद्द केले, हे समाजात जावून सांगण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Web Title: Maratha Reservation: Maratha leaders from BJP will tour the state, Vinayak Mete will prepare for the Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.