Maratha Reservation: संभाजीराजे भाजपापासून दूर जातायेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 12:43 PM2021-05-28T12:43:42+5:302021-05-28T12:45:16+5:30

मराठा आरक्षणावरून संभाजीराजे यांची सक्रीयता पाहता आता भाजपा नेते थेट त्यांच्याविरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे.

Maratha Reservation: MP Sambhaji Raje away from BJP? will meet CM Uddhav Thackeray today | Maratha Reservation: संभाजीराजे भाजपापासून दूर जातायेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडणार

Maratha Reservation: संभाजीराजे भाजपापासून दूर जातायेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडणार

Next
ठळक मुद्देज्यांनी खासदारकी दिली त्यांच्याबाबत असं बोलणं चुकीचं आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजपानं दिलं.मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरतायेत ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा भेट दिली नाही, हे सांगितले जाते. परंतु त्यांनी याआधी ४० वेळा भेट दिली ते खासदार संभाजीराजे का सांगत नाही?

मुंबई – मराठा आरक्षणावरून(Maratha Reservation) राज्यसभेचे छत्रपती खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुपारी संभाजीराजे(MP SambhajiRaje Bhosale) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेट घेणार आहेत. या भेटीनंतर संभाजीराजे आपली भूमिका मांडणार आहेत.

मराठा आरक्षणावरून संभाजीराजे यांची सक्रीयता पाहता आता भाजपा नेते थेट त्यांच्याविरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil), राणे पिता पुत्र यांचा समावेश आहे. संभाजीराजे यांनी शरद पवार, राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नारायण राणेंनी त्यांना टोला लगावला आहे. नारायण राणे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरतायेत ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत. ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्याबाबत असं बोलणं चुकीचं आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजपानं दिलं. ज्यांच्या दारी फिरतायेत त्यांनी काय केलं? शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं? असा सवालही नारायण राणेंनी(Narayan Rane) उपस्थित केला.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा भेट दिली नाही, हे सांगितले जाते. परंतु त्यांनी याआधी ४० वेळा भेट दिली ते खासदार संभाजीराजे का सांगत नाही? संभाजीराजे यांना खासदार केल्यानंतर अमित शहा यांनी मला त्यांना घेवून चार्टर्ड फ्लाइटने राष्ट्रीय अधिवेशनासाठी बोलावले. तेथे गेल्यानंतर कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल आपण सर्वजण उठून त्यांचे अभिनंदन करू या असे आवाहन शहा यांनी केले. तेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ नेते, मंत्र्यांनी उठून संभाजीराजे यांचे अभिनंदन केले. हा त्यांचा मोठा सन्मानच केला गेला. हे मात्र संभाजीराजे सांगत नाहीत. कोरोनाची स्थिती असल्याने आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संभाजीराजे ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी यांची भेट मागत आहेत, हा विषय राज्याच्या अखत्यारीतील असल्यामुळे कदाचित ही भेट होत नसावी. मात्र या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादीवाले याच मुद्द्यावरून संभाजीराजेंना प्रोत्साहीत करत असावेत असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

संभाजीराजे राजीनामा देणार असल्याची चर्चा

मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा लढा उभा करण्याची गरज आहे. परंतु हा लढा कार्यकर्त्यांनी नाही तर त्यांनी निवडून दिलेल्या आमदार, खासदार यांनी उभा करण्याची गरज आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणे हा एक भाग आहे. पण त्यासोबतच इतर पर्यायी मार्ग काय आहेत हे शोधण्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याचं सांगत वेळेप्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊ असं छत्रपती संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. गुरुवारपासून संभाजीराजे नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशावेळी भाजपा नेते त्यांच्यावर टीकेचे बाण सोडतायेत. त्यामुळे संभाजीराजे भाजपापासून दूर जात राजीनामा देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Maratha Reservation: MP Sambhaji Raje away from BJP? will meet CM Uddhav Thackeray today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.