Maratha Reservation: आता आम्हालाही ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ, मराठा आरक्षण न मिळाल्याने हर्षवर्धन जाधवांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 04:09 PM2021-07-11T16:09:43+5:302021-07-11T16:14:15+5:30
Maratha Reservation News: आता मराठा समाजाला ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.
हिंगाेली : मराठा आरक्षणासाठी मागील ४१ वर्षांपासून बलिदान, आत्मबलिदानाचा लढा दिल्यानंतरही ‘मराठा आरक्षण’ मिळत नसल्याने, आता मराठा समाजाला ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. (Now is the time to call us 'New Dalits', Harshvardhan Jadhav's reaction)
मराठा आरक्षणाची मागणी माेठी असून त्यासाठी माेर्चे, आंदाेलन, बलिदान, आत्मबलिदान करूनही सरकार आरक्षण देण्यास दिरंगाई करत आहे. यामुळे समाजातील प्रत्येकजण उद्विग्न झाला असून माेठ्या लढ्यानंतरही हातात भाेपळा आला असल्याने, पुन्हा संतापाची लाट तयार हाेत आहे. यामुळे येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्तचं कणखर हाेण्याची शक्यता असल्याने, आरक्षणाचा मार्ग कुठेतरी स्पष्ट हाेत आहे. मात्र याला राजकिय वळण न देता हा मुद्दा सामाजिक झाला पाहिजे.
सुप्रिम काेर्टाने मराठा आरक्षण नाकारले असले तरी, सत्तारूढ पक्षाने मराठा समाजाच्या वास्तविकेबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. यानंतर घटनादुरूस्ती करून समाजाला ‘न्याय’ देण्याचे काम राज्य व केंद्र सरकाने करणे गरजेचे आहे. कारण काकासाहेब शिंदे पासून ते गल्ले बाेरगावच्या तरूणापर्यत अनेकांनी बलिदान दिले आहे. आरक्षणाचा मुद्दा लवकर निकाली न काढल्यास तरूणामध्ये संतापाची लाट येण्यास वेळ लागणार नाही. याप्रसंगी डाॅ. ईशा जाधव, प्रा. चंद्रकांत भराट, युवराज बाेरसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती हाेती.